Donald Trump clarifies India hellhole remark citing deep respect for Indian leadership : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख “नरक” (हेलहोल) केल्याच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले की, ट्रम्प भारताला एक महान देश मानतात, ज्याचे नेतृत्व त्यांच्या (ट्रम्प यांच्या) एका अत्यंत चांगल्या मित्राच्या हातात आहे, असे त्यांचे मत आहे.

राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, भारत हा एक महान देश आहे, जेथे माझा एका अत्यंत चांगल्या मित्र सर्वोच्च पदावर आहे, असे अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी “आम्ही काही रिपोर्ट पाहिले आहेत,” असे म्हणत या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका

अमेरिकन रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांच्या एका कन्झर्व्हेटिव्ह राजकीय टॉक शोची ट्रान्सस्क्रिप्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर रीपोस्ट केली होती. या शोमध्ये मायकल सॅव्हेज यांनी भारत, चीन आणि इतर देशांचा उल्लेख ‘नरक’ (हेलहोल) असा केला होता. अमेरिकेच्या जन्मजात नागरिकत्व कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याबद्दल बोलताना सॅव्हेज यांनी हे विधान केले होते.

ट्रम्प यांनी मायकल सॅव्हेज यांच्या ‘सॅव्हेज नेशन’ या पॉडकास्टचा व्हिडीओ आणि संपूर्ण ट्रान्सस्क्रिप्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर भारतातील विरोधा पक्षांकडून केंद्र सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

सॅव्हेजच्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?

समोर आलेल्या व्हिडीओनुसार, “इथे जन्मल्यानंतर मुलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि नंतर ते चीन, भारत किंवा जगातील इतर कोणत्याही नरक (हेलहोल) जागेतून आपल्या संपूर्ण कुटुंबाला अमेरिकेत घेऊन येतात,” मायकल सॅव्हेज या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

ट्रम्प यांनी हा व्हिडीओ शेअर करून एकप्रकारे या विचारांचे समर्थन केले आहे. “तुम्हाला हे अनुभवण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. इथं इंग्रजी आता बोललं जात नाही. ते (स्थलांतरीत) या देशाप्रती इमानदार नाहीत”, असे सॅव्हेज पुढे म्हणतो.

याच व्हिडीओत अमेरिकेतील विशेषतः कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरभरतीवर भारतीय आणि चिनी लोकांचे वर्चस्व आहे, असा दावा करण्यात आला आहे. “गोऱ्या लोकांना नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज नाही, कारण सर्व अंतर्गत यंत्रणा भारतीय आणि चिनी लोकांकडून चालवल्या जातात”, असे या व्हिडीओत म्हटले आहे. भारतीयांचा मी समर्थक होतो पण इथं जे सुरु आहे ते पाहून माझे डोळे उघडले असे सॅव्हेज या व्हिडीओत म्हणत आहे. ट्रम्प यांनी या शोची स्क्रिप्ट देखील शेअर केली आहे.