Iran US Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नौदल, हवाई दल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे. याबाबत ट्रम्प सातत्याने बोलत असतात. दोनच दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी काही माध्यमं इराणचा पराभव झाला असला तरी, त्यांनी शरणागती पत्कारली असली तरी, इराणचा उदोउदो करत असल्याचा आरोप केला होता. यामध्ये ट्रम्प यांनी काही प्रमुख माध्यमांवर टीका केली. ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी इराणचे नौदल समुद्राच्या तळाला गेल्याची पोस्ट करत एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये इराणने एक चूक काढत ट्रम्प यांच्यावर टीका केली.
इराणी नौदल आणि हवाई उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्त हवाई हल्ला केला. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. यात इराणमधील इतरही अनेक बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर काही दिवस दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले सुरु होते. दरम्यान, शस्त्रसंधी झाल्यानंतर इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यास ट्रम्प यांनी सुरुवात केली. इराणचे नौदल, हवाई दल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत वारंवार पुनरुच्चार ट्रम्प करत असतात. अलिकडेच ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी इराणच्या नौदलाबाबत पोस्ट केली.
ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरील पोस्ट
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नौदल उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे. पण, काही माध्यमं इराणचे नौदल मजबूत असल्याचा दावा करत आहेत. यावरुनच ट्रम्प यांनी सीएनएन इराणचे नौदल मजबूत असल्याचे सांगत आहे. पण, सत्य परिस्थिती अशी आहे की, इराणी नौदल महासागराच्या तळाशी आहे, असे पोस्ट ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केली. यावरुनच इराणने ओबामा यांच्याशी तुलना करत ट्रम्प यांना ‘समुद्र’ व ‘महासागर’ यातला फरक कळत नाही, अशी टीका केली आहे.
इराणने केली बोचरी टीका
या पोस्टवरुन इराणने ट्रम्प यांच्यावर टीका केली. “ओबामा निःसंशय इराणीचे शत्रू होते, याबद्दल काहीच शंका नाही. पण, ट्रम्प यांच्यापेक्षा बराक सुशिक्षित होते आणि त्यांना ‘समुद्र’ व ‘महासागर’ यातील फरक कळत होता”, अशी खोचक टीका हैद्राबादमधील इराणी दूतावासाने केली आहे.
ट्रम्प यांनी माध्यमांवर टीका
“इराणने शरणागती पत्करली, त्यांचे नौदल नष्ट होऊन समुद्राच्या तळाशी विसावले, हवाई दल अस्तित्वात नाही हे मान्य केले. संपूर्ण सैन्याने शस्त्रे खाली टाकून मी शरण येत आहे अशी घोषणा केली. अमेरिकेच्या अफाट शक्ती आणि सामर्थ्यासमोर इराणने पराभव मान्य केला; तरीही द फेलिंग न्यूयॉर्क टाइम्स, द चायना स्ट्रीट जर्नल, भ्रष्ट सीएनएन तसेच इतर फेक न्यूज मीडिया इराणने अमेरिकेवर विजय मिळवला अशीच बातमी प्रसिद्ध करतील. ड्यूमॅक्रॅट्स आणि प्रसारमाध्यमं पूर्णपणे भरकटली आहेत, वेडे झाले आहेत”, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती.
