Donlad Trump कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रम्प ( Donlad Trump ) यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत पार पडली. या लढतीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अधिक मतं मिळाली आणि ट्रम्प आता अमेरिकेचे नवे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. डोनाल्ड ट्रम्प ( Donlad Trump ) यांच्या आयुष्यात आलेलं पॉर्नस्टार स्ट्रॉमी डॅनियल्सचं प्रकरण चर्चेत आलं आहे.

स्ट्रॉमी डॅनियल्स कोण आहे?

स्ट्रॉमी डॅनियल्स ही ४५ वर्षांची असून तिचं खरं नाव स्टेफनी क्लिफोर्ड आहे. अमेरिकेतील लुईसिआना इथं जन्मलेली स्ट्रॉमी डॅनिएल्स एक पॉर्न स्टार आणि दिग्दर्शक आहे. तिच्या चित्रपटांसाठी तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. पॉर्न फिल्म्सबरोबरच तिनं हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येदेखील भूमिका केल्या आहेत. यात ‘द 40 ईयर ओल्ड व्हर्जिन’ आणि ‘नॉक्ट अप’ यासारखे २००० च्या दशकातील विनोदी चित्रपटदेखील आहेत. ती राजकारणात देखील उतरली होती आणि सुरूवातीला ती रिपब्लिकन पक्षाकडून होती. डोनाल्ड ट्रम्प हे याच रिपब्लिकन पक्षाचे आहेत.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

स्ट्रॉमी डॅनियल्सचे आरोप काय होते?

स्ट्रॉमी डॅनियल्सने प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतींमध्ये असं म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प ( Donlad Trump ) यांची आणि तिची भेट जुलै २००६ मध्ये समाजसेवेसाठी निधी गोळा करणाऱ्या एका गोल्फ स्पर्धेत झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी ( Donlad Trump ) आणि तिने कॅलिफोर्निया आणि नेवाडा दरम्यान असणाऱ्या लेक ताहो या रिसोर्ट मधील हॉटेलच्या रुममध्ये एकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिनं केला होता. त्यावेळेस ट्रम्प यांच्या वकिलानं डॅनियल्सचा आरोप जोरकसपणे धुडकावून लावला होता.

स्ट्रॉमी डॅनियल्सने मुलाखतीत काय सांगितलं?

ट्रम्प यांनी तिला त्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल गप्प राहण्यास सांगितलं आहे का? या मुलाखतकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला ”त्यांना याबद्दल कोणताही चिंता दिसत नाही. ते खूपच उद्धट आहेत,” असं उत्तर डॅनियल्सनं दिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिआ ट्रम्प त्या गोल्फ स्पर्धेच्या ठिकाणी हजर नव्हत्या, असंही तिने सांगितलं होतं.

विश्लेषण : ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’… भारताशी संबंध कसे? मोदी ‘कनेक्ट’चा किती फायदा?

स्ट्रॉमी डॅनियल्सला धमक्या आणि पैशांचं आमिष

स्ट्रॉर्मी डॅनियल्सने तिला पैशांचं आमिष दाखवण्यात आलं होतं असंही सांगितलं. मला गप्प राहण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलर्सची रक्कम देण्यात आली होती. मी ते पैसे घेतले होते पण कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची वाटली होती. तसंच त्यानंतर गप्प राहण्यासाठी मला धमक्या देण्यात आल्या असंही डॅनियल्सने सांगितलं होतं. २०१८ मध्ये आपल्याला लास वेगासच्या पार्किंगमध्ये एक अनोळखी व्यक्ती भेटली त्या व्यक्तीने मला आणि माझ्या बाळाला ट्रम्पपासून दूर राहण्याची आणि कुठल्याच प्रसंगाची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. इन टच या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्ट्रॉर्मी डॅनियल्सने हा आरोप केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?

मॅनहॅटन येथील फौजदारी न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळे आरोप धुडकावले होते. स्ट्रॉर्मी डॅनियल्सला पैसे दिले आणि गप्प बसण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आला होता. तसंच प्लेबॉय या मासिकाच्या एका माजी मॉडेलशी डोनाल्ड ट्रम्प यांचे कथित लैंगिक संबंध होते असाही आरोप झाला होता. डोनाल्ड ट्रम्प आता पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याने अनेकांना या प्रकरणाची आठवण झाली आहे.

Story img Loader