मी देवाने आतापर्यंत जन्माला घातलेला सर्वात मोठा रोजगार निर्माता बनेन, असे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्याच पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. माझ्या कार्यकाळात अधिक नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. यावेळी ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांकडून फुटलेल्या माहितीच्याआधारे त्यांच्यावर करण्यात येत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. आपण हँकिंगबद्दल बोलत असू तर ते वाईट आहे आणि ते करता कामा नये. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या रशियाशी असलेल्या संबंधाबाबतची कागदपत्रे खोटी असल्याचा दावा केला. काही विकृत लोक जाणूनबुजून अशाप्रकारचे गैरसमज पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले. हा माझ्या कारकीर्दीवरील सर्वात मोठा कलंक ठरेल. मला आशा आहे की, पुतीन यांच्याबरोबर माझे चांगले संबंध राहतील. पुतीन यांना मी आवडत असेल, तर ती जमेची बाब आहे. माझे रशियासोबत कोणतेही व्यवहार नाहीत, हे मी ट्विट करून सांगितले होते. मी रशियाकडून कोणतेही कर्जही घेतलेले नाही. माझ्यावर फार थोडे कर्ज असले तरी ती बाब मान्य करायला मला शरम वाटत नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली.

 

Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

तत्पूर्वी, ओबामा यांनी शिकागो येथे राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील शेवटचे भाषण केले. प्रत्येक दिवशी मी तुमच्याकडून काहीतरी शिकलो. मला चांगला राष्ट्राध्यक्ष, चांगला माणूस बनवण्यात तुमचा मोठा वाटा आहे, असे म्हणत बराक ओबामा यांनी अमेरिकन जनतेचे आभार मानले. या वेळी ओबामा हे भावूक झाले होते. ‘यस वी कॅन, यस वी डिड इट’ असे म्हणत त्यांनी आपल्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. त्यांनी पत्नी मिशेल ओबामा यांचेही आभार मानले. मिशेल ही माझी पत्नी, मुलांची आईच नव्हे तर माझी ती जीवलग मैत्रिण असल्याचे ते म्हणाले.  तिने आई म्हणून महत्वाची कामगिरी बजावल्याचे ते म्हटले. या प्रसंगी मिशेल व त्यांच्या मुलींनाही अश्रू अनावर झाले.

बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात वर्णभेद, दहशतवाद, अर्थव्यवस्था, जागतिक महासत्ता आदी विविध विषयांवर भाष्य केले. उपस्थित लोकांनी जेव्हा आणखी एक टर्म राष्ट्राध्यक्ष राहा अशी मागणी ओबामांना आग्रह करू लागले. तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रपणे हे शक्य नसल्याचे म्हटले. सशक्त लोकशाहीसाठी एकतेची गरज असते, आणि ती आपल्याकडे आहे. गेल्या १० दिवसांत आपण भक्कम लोकशाहीतील बदल पाहत आहोत. अत्यंत शांतपणे नव्या राष्ट्राध्यक्षांकडे सत्तांतरण होत असल्याचे ते म्हणाले.