ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना व्हाईट हाऊसच्या ईस्ट रुममध्ये स्टेट ऑफ डिनरसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किंग चार्ल्स तृतीय यांची भेट झाली आणि त्यांनी स्नेहभोजनाधी एकत्र ‘टोस्ट’ही केलं. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि ब्रिटनच्या राणी कॅमेलिया यांचीही उपस्थिती होती. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहे.
डोनाल्ड ट्रम्प किंग चार्ल्स तृतीय यांच्याविषयी काय म्हणाले?
या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की माझ्या आईचा जन्म स्कॉटलँडचा आहे. माझी आई अॅनी मेकलॉड यांचा किंग चार्ल्स तृतीय यांच्यावर सिक्रेट क्रश होता. डोनाल्ड ट्रम्प असंही म्हणाले की ब्रिटनचं राजघराणं माझ्या आईला खूप आवडायचं. राणी एलिझाबेथ यांचं व्यक्तिमत्वही तिला कमालीचं वाटायचं. डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की राणी एलिजाबेथ जेव्हा कुठल्या कार्यक्रमात दिसायच्या तत तेव्हा माझी आई टीव्हीसमोरुन बाजूलाच व्हायची नाही. मला ती कायम सांगायची बघ डोनाल्ड किती सुंदर राणी आहे ती. तसंच तृतीय चार्ल्सही माझ्या आईला आवडत होते. मला आजही हे लक्षात आहे की मला आई सांगायची की तृतीय चार्ल्सही दिसायला खूप सुंदर आहेत. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रिन्स चार्ल्स तृतीय यांना म्हणाले माझ्या आईला तुम्ही आवडत होतात. तुम्ही तिचा सिक्रेट क्रश होतात. तुमचा यावर विश्वास बसतो आहे. आता तिला काय वाटत असेल असंही मला वाटतं आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं किंग चार्ल्स तृतीय यांचं स्वागत
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस या ठिकाणी किंग चार्ल्स तृतीय यांचं कौतुक केलं. तसंच या ठिकाणी जो समारंभ आयोजित करण्यात आला होता तिथे त्यांनी किंग चार्ल्स तृतीय आणि महाराणी कॅमेलिया यांचं स्वागत केलं. सध्या दोघंही राजकीय दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉटिशशी आपलं नातं आहे असंही सांगितलं. त्यांनी सांगितलं की माझी आई स्कॉटलँडच्या स्टॉर्नोर्वे या ठिकाणी जन्मली होती. वयाच्या १९ व्या वर्षी ती अमेरिकेत आली होती. तसंच ते असंही म्हणाले की महाराणी एलिझाबेथ या खूप खास होत्या. मला त्यांच्याविषयी आदर होता असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची आई अॅनी मॅकलॉड ट्रम्प कोण होत्या?
डोनाल्ड ट्रम्प यांची आई अॅनी मॅकलॉड यांचा जन्म १० मे १९१२ ला स्कॉटलँड या ठिकाणी झाला होता. त्या त्यांच्या १० भावंडांपैकी एक होत्या. १९३० मध्ये साधारण वयाच्या १८ व्या वर्षी त्या अमेरिकेला गेल्या. न्यूयॉर्क या ठिकाणी त्या हाऊस हेल्प म्हणून काम रु लागल्या, इतर छोटी कामं केली. त्यानंतर त्यांची भेट फ्रेड ट्रम्प यांच्याशी झाली. फ्रेड ट्रम्प हे यशस्वी उद्योजक होते. १९३६ मध्ये फ्रेड आणि अॅनी या दोघांनीही लग्न केलं. शांत स्वभाव आणि कौटुंबिक जीवन शांतपणे जगायची. मुलांना त्यांनी योग्य पद्धतीने वाढवलं आणि ज्यापैकी एक डोनाल्ड ट्रम्प आहेत. अॅनी यांचा मृत्यू ७ ऑगस्ट २००० या वर्षी न्यूयॉर्कमध्ये झाला.
किंग चार्ल्स तृतीय यांच्याविषयीही महत्त्वाची माहिती
ब्रिटिश साम्राज्यात सर्वाधिक काळ राजगादीचे वारसदार म्हणून राहण्याचा विक्रम नावावर असलेले प्रिन्स चार्ल्स राणी एलिजाबेथ यांच्या निधनानंतर म्हणजेच २०२२ पासून किंग चार्ल्स तृतीय म्हणून ओळखले जातात.
किंग चार्ल्स यांनी महाराणी एलिजाबेथ यांच्या छत्राखाली काम करताना जगभरातील नेत्यांच्या पीढ्या बदलताना पाहिल्या. त्यांच्या कार्यकाळात खुद्द युकेमध्ये १५ पंतप्रधान तर अमेरिकेत १४ पंतप्रधान झाले.
किंग चार्ल्स यांना जवळून ओळखणाऱ्या लोकांच्या मते ते काहीसे लाजाळू आणि मितभाषी व्यक्ती आहेत. सोप्या शब्दांत त्यांचं वर्णन संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून करता येईल.
किंग चार्ल्स हे आतार्यंत ४०० हून अधिक संस्थांचे विश्वस्त अथवा अध्यक्ष राहिले आहेत. १९७६ मध्ये त्यांनी आपल्या रॉयल नेव्हीच्या कमाईच्या पैशांतून स्वतःच्या धर्मादाय संस्थेची स्थापना केली होती.
