Donald Trump Renames Strait of Hormuz: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला असला तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर दोन्ही देशात संघर्ष तीव्र झाला आहे. इराणने होर्मुझ खुली करण्यास तयारी दर्शवली असली तरी अमेरिकेने नाकेबंदी हटवल्याशिवाय ते शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशात ट्रम्प यांनी इराणचा नवा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पण, ट्रम्प यांनी होर्मुझवरुन इराणची नव्याने छेड काढली आहे. यावेळी ट्रम्प यांनी होर्मुझचे नावच बदलून स्वत:चे नाव दिले आहे. विशेष म्हणजे पर्शियन गल्फ दिवस साजरा होत असतान ट्रम्प यांनी इराणला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवर शेअर
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक फोटो शेअर केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीचा हा फोटो आहे. पण, या फोटोवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांची सामुद्रधुनी असे लिहले आहे. हा फोटो आय स्टँड विथ ट्रम्प या मुख्या खात्यावरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. तीच पोस्ट ट्रम्प यांनी पुन्हा शेअर केली आहे.
इराणला डिवचण्याचा प्रयत्न
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी देखील इराणला यावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका भाषणात होर्मुझ सामुद्रधुनीचा ट्रम्प यांची सामुद्रधुनी असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावरुन त्यांनी लगेचच माफी करत त्याचा होर्मुझ असा उल्लेख केला होता. ट्रम्प यांचे हे वक्तव्य आणि आता केलेली पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
इराणकडून टीका
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांच्या या चुकीच्या उल्लेखावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. “आज इराणमध्ये ‘पर्शियन गल्फ डे’ आहे, जो ४०० वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पोर्तुगीजांना हाकलून लावल्याच्या घटनेची आठवण करून देतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘पर्शियन गल्फ’ ही योग्य संज्ञा वापरली आहे ती पेंटागॉनची खोटी आवृत्ती नाही. पण होर्मुझला दुसरे काहीही म्हणणे ही खरोखरच एक भयंकर चूक आहे”, असे अराघची यांनी एक्सवर पोस्ट करुन म्हटले आहे.
चर्चा रखडली
आज दिवसभरात अमेरिका आणि इराण यांच्यातील रखडलेल्या चर्चेवरुन विविध घडामोडी समोर आल्या. इराणने अमेरिकेसमोर ठेवलेला प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला. अण्वस्त्र कार्यक्रमावरुन चर्चेसाठी इराणने नकार दिलाय शिवाय होर्मुझची नाकेबंदी काढण्याचा आग्रह धरला आहे. मोजतबा खामेनी यांनी देखील अण्वस्त्र कार्यक्रम देशाची खरी संपत्ती असल्याचा उल्लेख करताना क्षेपणास्त्र क्षमतेचा त्याग करण्यास नकार दिला आहे. त
