अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणने देखील अमेरिका आणि इस्रायवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेत संघर्ष पेटला असून या युद्धाच्या झळा जगातील अनेक देशांना बसत आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मुद्द्यावर चांगलीच कठोर भूमिका घेतली आहे.

मध्यपूर्वेतील संघर्षाने व्यापक युद्धाचे रूप धारण केले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणबाबत आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. इराणने बिनशर्त शरणागती पत्करल्याशिवाय इराणशी कोणताही करार होणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

“इराणने बिनशर्त शरणागती पत्करल्याशिवाय कोणताही करार केला जाणार नाही! त्यानंतरच, एका महान आणि स्वीकारार्ह असलेले नेत्याची (किंवा नेत्यांची) निवड झाल्यानंतर, आम्ही आणि आमचे अनेक अद्भुत आणि पराक्रमी सहकारी देश आणि भागीदार इराणला उद्ध्वस्त झाल्याच्या स्थितीतून परत आणसाठी अथक परिश्रम करू. आम्ही त्याला आर्थिकदृष्या आणखी मोठा, चांगला आणि मजबूद बनवू. इराणे भवितव्य चांगले असेल. ‘मेक इराण ग्रेट अगेन’ (MIGA!),” असे ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणमध्ये केलेल्या हल्ल्याच्या सुमारे एक आठवड्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. सध्या इराणनने देखील इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे.

ट्रम्प यांनी गुरूवारी त्यांना इराणचे राजकीय भवितव्य ठरवण्यात थेट भूमिका बजावण्याची इच्छा असल्याचे नमूद केले होते. Axion ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, व्हेनेझुएलाच्या बाबतीत केले होते, त्याचप्रमाणे त्यांना इराणचा देखील पुढील नेता निवडण्यामध्ये वैयक्तिकरित्या सहभागी होण्याची इच्छा आहे.

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे ५६ वर्षीय पुत्र मोजताबा खामेनी यांच्याबद्दलही ट्रम्प यांनी भाष्य केले होते. मोजताबा यांच्यासारखी ‘लाईटवेट’ व्यक्ती इराणच्या प्रमुखपदी असणे हे स्वीकारता येण्यासारखे नसल्याचे ट्रम्प म्हणाले होते.