President Donald Trump questioning the strength of the US-UK special relationship : इराणविरोधात पुकारलेल्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी कडवट भूमिका घेतली आहे. सातत्याने त्यांनी इराणविरोधातील कारवाईबाबत माहिती देत युद्धातील रणनीती सांगितली. आता त्यांनी थेट ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर टीका केली. सुरुवातीला ब्रिटिश तळांचा वापर करण्यास लंडनने नकार दिला होता. परंतु, आता मध्य पूर्तेवत दोन विमानवाहू जहाजे तैनात करण्याचा लंडन गांभीर्याने विचार करत आहे. परंतु, सध्या सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकन सैन्याला त्यांची गरज नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या ब्रिटिश तळांचा वापर करण्यास लंडनने नकार दिला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली. दोन्ही लष्करी सहयोगी देशांमधील ऐतिहासिकदृष्ट्या जवळचे संबंद ब्रिटिशने बिघडवले असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराणबरोबरच्या संघर्षादरम्यान ब्रिटिशांचा पाठिंबा कमी होता, हे अमेरिकेच्या कायम लक्षात राहील असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
“युनायटेड किंग्डम, जो आपला एकेकाळी महान मित्र होता, कदाचित त्या सर्वांमध्ये महान होता, तो अखेर मध्य पूर्वेत दोन विमानवाहू जहाजे पाठवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे,” असे ट्रम्प म्हणाले. “ते ठीक आहे, पंतप्रधान स्टारमर, आम्हाला आता त्यांची गरज नाही. पण आम्ही हे लक्षात ठेवू. युद्ध जिंकल्यानंतर त्यात सामील होणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही.”

शनिवारी ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने प्रिन्स ऑफ वेल्स विमानवाहू जहाजाला संभाव्य तैनातीसाठी तयार करत असल्याचे सांगितल्यानंतर सोशल मीडियावर ही पोस्ट आली. दरम्यान, मध्य पूर्वेत विमानवाहू जहाज तैनात करायचे की नाही याबद्दल अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.
ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांची भूमिका काय?
इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकन सैन्याला ब्रिटीश तळांचा वापर करण्याची परवानगी न देण्याच्या आपल्या भूमिकेचे स्टारमर यांनी समर्थन केले आहे आणि म्हटले आहे की कोणतीही लष्करी कारवाई कायदेशीर आणि सुनियोजित आहे याची त्यांना खात्री असणे आवश्यक आहे. नंतर त्यांनी अमेरिकन सैन्याला स्टोरेज डेपो किंवा लाँचर्समधील इराणी क्षेपणास्त्रांवर बचावात्मक हल्ले करण्यासाठी ब्रिटिश तळांचा वापर करण्याची परवानगी दिली.
