अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) हे त्यांचं नवं अ‍ॅप फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार आहे. २१ फेब्रुवारीपासून ‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध असेल. हे अ‍ॅप ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) द्वारे बनवले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवीन मीडिया कंपनी अमेरिकेचे माजी रिपब्लिकन डेव्हिन नुनेस यांच्या नेतृत्वाखाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रुथ सोशल अ‍ॅप हे ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखंच दिसत आहे. प्रोफाइल पेज जवळजवळ ट्विटर अ‍ॅपसारखे दिसत आहे आणि पोस्टमध्ये प्रत्युत्तरे, रीट्विट्स, पसंती आणि शेअरिंगसाठी चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी माझ्यावर बंदी घातली अशा बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मीडिया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकी अध्यक्ष शांत बसले आहेत, अशी खोचक टीकाही ट्रम्प यांनी त्यावेळी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump will launch new social media app like twitter vsk
First published on: 07-01-2022 at 10:28 IST