US President Donald Trump On Iran-Israel War : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल-इराणमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांच्या शहरांना टार्गेट करत करत आहेत. मात्र, या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत ते नष्ट केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देत कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर सहा पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागले. त्यामुळे हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (२४ जून) इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतरही इराणने तेल अवीववर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आणि हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचं इस्रायलने म्हटलं. त्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही इराणच्या शस्त्रविरामाच्या उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश लष्कराला दिले. त्यामुळे ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी ठरल्याची चर्चा रंगली. मात्र, यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत इस्रायलवर नाराजी व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे आज नाटो शिखर परिषदेसाठी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी इस्रायल आणि इराणवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की इस्रायल आता इराणवर हल्ला करणार नाही आणि सर्व इस्रायली विमाने परत माघारी परततील. तसेच इराण देखील कधीही आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार नाही. मात्र, असं सांगताना ट्रम्प यांनी इस्रायलवर संताप व्यक्त केला.

ट्रम्प म्हणाले की, ‘शस्त्रविरामाची घेषणा केल्यानंतर लगेच इस्रायलने एवढा मोठा बॉम्ब टाकला की मी आजवर पाहिलाच नाही. आम्ही १२ तासांसाठी शस्त्रविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली. पण त्यांनी पहिल्याच तासात बॉम्ब टाकले. त्यामुळे मी इस्रायलवर नाराज आहे, इराणवर देखील नाराज आहे’, असं म्हणत ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “आता बॉम्ब टाकू नका, जर तुम्ही असं केलं तर ते शस्त्रविरामाचं उल्लंघन ठरेल. तुम्ही तुमच्या वैमानिकांना आत्ताच परत बोलवा”, असं ट्रम्प यांनी इस्रायलला उद्देशून म्हटलं आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला शांत राहण्याचं आवाहन केलं असून आपल्याकडे मुळात दोन देश इतके दिवस आणि इतके तीव्रपणे लढत आहेत की त्यांना कळत नाही की ते काय करत आहेत, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.