दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर मतदानोत्तर चाचण्यांनी ‘आप’ बहुमताचा पल्ला गाठेल असे वर्तविल्यानंतर भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी मतदानोत्तर चाचण्यांवर विश्वास नसून पराभव अथवा विजय, जे काही वाट्याला येईल त्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.
लाल किल्ला: संदर्भ बदलणारी निवडणूक
मतदानोत्तर चाचण्यांनी हुरळून जाण्याची आवश्यकता नसून मंगळवारी हे सर्व आकडे खोटे ठरतील असा विश्वास असल्याचेही त्या म्हणाल्या. केलेल्या कामांची जबाबदारी पूर्णपणे स्विकारणे आणि मिळालेल्या विजयात सर्वांना वाटेकरी समजणे याच तत्वज्ञानाने गेली अनेक वर्षे मी चालत आले आहे. त्यामुळे राजकीय जीवनात देखील आपल्या निर्णयांची सर्वस्वी जबाबदारी स्विकारण्यास तयार असून पराभव वाट्याला आल्यास त्याला संपूर्णपणे मी कारणीभूत असेन, असेही बेदी पुढे म्हणाल्या. मतदानोत्तर चाचण्या हे फक्त सर्वेक्षण आहे याचा निकालाशी संबंध नाही. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा निकालांची वाट पाहणे योग्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले.