scorecardresearch

डाऊिनग स्ट्रीट मेजवान्यांची पोलीस चौकशी

भरात टाळेबंदी असतानाही असे कार्यक्रम आयोजित केल्याच्या आरोपावरून बोरिस जॉन्सन सरकारवर टीकेचे प्रहार सुरू आहेत.

लंडन : करोना टाळेबंदीच्या काळात डाऊिनग पथावरील पंतप्रधान कार्यालयात झालेल्या मेजवान्यांचा तपास केला जात आहे, असे लंडन पोलिसांतर्फे सांगण्यात आले. करोनाचे निर्बंध जारी असतानाच्या कालावधीतही काही कार्यक्रम आयोजित केल्याच्या आरोपावरून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारवर टीका होत आहे.  

लंडनच्या विधानमंडळात महानगर पोलीस आयुक्त क्रेसिडा डिक यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डाऊिनग स्ट्रीटवर टाळेबंदीच्या काळात झालेल्या मेजवान्यांची चौकशी सुरू आहे. डाऊिनग स्ट्रीटवर टाळेबंदीत झालेल्या अनेक कार्यक्रमांचा तपास स्कॉटलंड यार्डकडून केला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  देशभरात टाळेबंदी असतानाही असे कार्यक्रम आयोजित केल्याच्या आरोपावरून बोरिस जॉन्सन सरकारवर टीकेचे प्रहार सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Downing street parties police to investigate breach of covid 19 regulations by uk pm boris johnson zws