scorecardresearch

दिलासादायक! ‘या’ औषधामुळे करोना रुग्णांना मिळणार संजीवनी

करोना रुग्णांना दिलासा

दिलासादायक! ‘या’ औषधामुळे करोना रुग्णांना मिळणार संजीवनी

करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वाधिक गरज ऑक्सिजनची असते. त्यामुळे गेल्या काही दिवसात अनेक राज्यांनी वाढीव ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. न्यायालयानेही या बाबीची गंभीर दखल घेत राज्यांना योग्य तो ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच ऑक्सिजन पुरवठा कमी होत असताना वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. मात्र डीआरडीओच्या औषधामुळे करोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज आता कमी होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने करोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसन अँड अलायड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने एकत्रितपणे तयार केलं आहे.

या औषधाला 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव दिलं आहे. डीआरडीओने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. तसेच या औषधाच्या निर्मितीची जबाबदारी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला देण्यात आली आहे.

या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पार पडलं आहे. ज्या रुग्णांना या औषधाची मात्रा दिली होती. ते रुग्ण लवकर बरे झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्या रुग्णांना ऑक्सिजन गरज जास्त भासली नसल्याचंही निदर्शनास आलं आहे. रुग्णही लवकर बरे होत असल्याचं समोर आलं आहे.

मोदींचं करोना नियंत्रणापेक्षा टीकाकारांना गप्प करण्यास प्राधान्य – लॅन्सेट

दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत. रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी करोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं. एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-05-2021 at 17:27 IST

संबंधित बातम्या