भविष्यवेधी युद्धतंत्राचा विचार करून भारत आता यंत्रमानवाच्या रूपातील सैनिक तयार करणार आहे. निर्मनुष्य युद्धक्षमता वाढवण्यात यशस्वी ठरणाऱ्या देशांच्या पंक्तीत त्यामुळे आपल्या देशाला स्थान मिळणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जाणार असून उच्च बुद्धिमत्ता क्षमता असलेले यंत्रमानव त्यासाठी विकसित करण्यात येणार आहेत. शत्रू व मित्र यातील फरक ओळखण्याची क्षमता त्यांच्यात तयार केली जाईल.मानवी हानी टाळण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल,असे डीआरडीओप्रमुख चंदर यांनी सांगितले.