स्टार वॉर्स! DRDO चं पुढचं लक्ष्य लेझर वेपन, मिसाइलशिवाय फायटर विमान नष्ट करण्याची टेक्नोलॉजी

…म्हणून भारताला अत्यंत वेगाने ही टेक्नोलॉजी डेव्हलप करावीच लागेल

फोटो सौजन्य – AP

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. डीआरडीओ एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना बनवत आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.

ज्यामध्ये मिसाइल, फायटर विमान लेझर किरणं किंवा उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींनी नष्ट करता येईल. अमेरिका, चीन आणि युरोपियन देश हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठया प्रमाणावर मेहनत घेत आहेत. भारतातही या कार्यक्रमावर काम सुरु आहे पण आता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय कार्यक्रमाचे छोटे, मध्यम आणि दीर्घकालीन उद्देश साध्य करण्याचे लक्ष्य असेल. देशांतर्गत उद्योगाच्या मदतीने १०० किलोवॅट पॉवरची वेगवेगळी डायरेक्टेड एनर्जी वेपन विकसित करण्याचे लक्ष्य आहे. डीआरडीओ अनेक DEW प्रकल्पांवर काम करत आहे. यात केमिकल ऑक्सिजन आयोडाइन, हायपॉवर फायबर लेझर ते गुप्त ‘काली’ प्रोजेक्ट आहे. काली हे पार्टीकल बीम वेपन आहे. काली प्रकल्पातंर्गत शत्रूची येणारी मिसाइल्स आणि फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

यातला एकही प्रकल्प कार्यरत होण्याच्या जवळपास नाही. DEW प्रकल्पांवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. लडाख सीमेवर चीन बरोबर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर DEW प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे तसेच तो वेगाने पूर्ण करण्याची निकडही लक्षात आली आहे. डीआरडीओने आतापर्यंत ड्रोन विरोधी DEW सिस्टिम विकसित केली आहे. दोन किलोमीटरच्या रेंजमधील हवाई लक्ष्य भेदण्यासाठी हे १० किलोवॅटचे DEW मशीन सक्षम आहे. डीआरडीओने या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी सुद्धा करुन दाखवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drdo plans star wars style directed energy weapons for battles of future dmp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या