देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध समारंभांचं आयोजन करण्यात येतंय. राजधानी दिल्लीत तर बिटिंग रिट्रिट समारंभात लेजर शो आणि १००० भारतीय बनावटीच्या ड्रोनचं सादरीकरण पाहायला मिळणार आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये जबलपूर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एक ड्रोन खाली पडलं. यामुळे २ जण जखमी झाल्याची घटना घडलीय.

नेमकं काय घडलं?

जखमींपैकी एकाच्या भावाने सांगितलं की मैदानावर प्रजासत्ता दिनानिमित्त सादरीकरण सुरू होतं. त्यावेळी अचानक एक ड्रोन खाली येऊन काही लोकांच्या डोक्यावर आदळलं. त्यात ते जखमी झाले.

Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

हेही वाचा : Republic Day 2022: संपूर्ण जगाने अनुभवलं भारताचं सामर्थ्य आणि संस्कृती; सैन्यदलांची साहसी प्रात्यक्षिकं

घटनास्थळावर उपस्थित डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “जखमींमध्ये एका पुरुषाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. त्या दोघांनाही ड्रोनने धडक दिल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.”

दरम्यान, आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्यानं हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच २३ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती, तर ३० जानेवारीला शहीद दिवस आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी दिल्ली पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. लसीकरण यावेळी अनिवार्य होतं. तसंच १५ पेक्षा लहान वयाच्या मुलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले. यावेळी तिन्ही सैन्यदलांनी आपल्या शक्ती आणि सामर्थ्याचं प्रदर्शन केलं. तसंच ४८० कलाकारांनी ‘वंदे भारतम’ या संकल्पेंतर्गत नृत्याविष्कार सादर करत भारताच्या संस्कृतीचं दर्शन केलं.

महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार

संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरली आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” आहेत, ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. सुमारे 15 प्राणी आणि 22 वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली.