ओडिशामध्ये बालासोर इथं कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. बहनागा स्टेशनजवळ झालेल्या या अपघातात रेल्वेंची धडक एवढी जोरदार होती की एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले.

हेही वाचा – Odisha train accident : “कुणाचा हात कापला गेला तर कुणाचा पाय….” कोरोमंडल एक्स्प्रेसच्या प्रवाशाने सांगितली आपबीती

Fight Between Two Bull mp saand fight video goes viral viral on social media people will shocked
भररस्त्यात पिसाळलेल्या बैलांची झुंज; सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाच शिंगावर उचललं अन्…; पाहा थरारक VIDEO
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..

रेल्वेचा अपघात झाल्यानंतर बचाव कार्य सुरू आहे. रेल्वेत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर, रुग्णालयात रक्तदान करण्यासाठीही नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशातच या रेल्वे अपघाताचा ड्रोन व्हिडीओ ‘एएनआय’ने शेअर केला आहे.

हेही वाचा – किंकाळ्या, आरोळ्या आणि मृत्यूचं तांडव! कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

या व्हिडीओमध्ये सध्या घटनास्थळी काय परिस्थिती आहे, ते पाहायला मिळत आहे. यामध्ये अपघातग्रस्त व रुळावरून खाली उतरलेल्या दोन रेल्वे दिसत आहेत. तर, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. रेल्वेतून जखमी व मृतांना बाहेर काढण्यात येतंय. शेजारी असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत.

दरम्यान, या घटननंतर ओडिशामध्ये आज दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलंय. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बालासोर जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.