राइज अँड फॉल या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. या सिझनच्या पहिल्याच भागात स्वरा भास्कर आणि शहजाद पूनावाला यांच्यात वाद झाला आहे. ज्यामुळे हा रिअॅलिटी शो चर्चेत आला आहे. वीरेंद्र सहवागने जेव्हा पेंट हाऊसमध्ये जे राहतील त्यांची नावं जाहीर केली आहेत त्यात स्वरा भास्करचं नाव होतं. ज्यावर ये कैसा न्याय है या गाण्याची ओळ शहजाद पूनावाला यांनी गुणगुणली.

स्वरा भास्कर आणि शहजाद पूनावाला दोघंही शोमध्ये सहभागी

शहजाद पूनावाला म्हणाले मला निराश करू शकेल असा कुणीही माइक लाल जन्माला आलेला नाही. तसंच स्वरा भास्करचं नाव न घेता मी काही लोकांना टाळतोच आहे असंही ते म्हणाले. इग्नोर करतो मी अशा लोकांना. ज्यावर स्वरा भास्करने उत्तर दिलंय.

स्वरा आणि शहजाद पूनावाला यांच्यात काय वाद झाला?

स्वरा भास्कर म्हणाली इग्नोरचा अर्थ काय असतो? दुर्लक्ष करणं ना? कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या माणसाने (शहजाद पूनावाला) ३६ ट्वीट केले. तीन चार व्हिडीओ दिले. मला कुठेतरी पाठवण्यासाठी ५० हजार कमेंट्स करायला लावल्या. यांची टीम यांच्यासाठी मतं मागत नाहीये, मला ट्रोल करण्यात गुंतली आहे. इग्नोरचा अर्थ हा नसतो. त्यावर पूनावाला म्हणाले जो देशाच्या विरोधात बोलेल त्याला आम्ही असंच उत्तर देणार, कायम उत्तर देणार. त्यावर स्वरा म्हणते हा गेम आहे. यांचं डुबतं राजकीय करिअर इथून पुन्हा आकार घेणार नाही. त्यावर पूनावाला म्हणतात माझ्या करीअरची चिंता करू नको तू त्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला निवडून आणता येतंय का बघ. असं म्हणत या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहण्यास मिळाली. मै इस किचड मिट्टीमें इंटरेस्टेड नहीं असं म्हणत स्वरानेही शहजाद पूनावाला यांना उत्तर दिलं आहे.

राइज अँड फॉल या रिअॅलिटी शोमध्ये शहजाद पूनावाला, स्वरा भास्कर यांच्यासह गौतम गुलाटी, कायरा अनु, अभिनेता करण पटेल, प्रियंका चाहर चौधरी, राजकीय नेते तेजप्रताप यादव, पत्रकार मनिष कश्यप, कॉमेडियन राजा ग्रोव्हर, झरीना रूडाकोवा या स्पर्धकांचाही समावेश आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सहवाग हा या शोचा होस्ट आहे. दुसऱ्या सिझनच्या पहिल्याच भागात स्वरा भास्कर आणि शहजाद पूनावाला यांच्यात वादावादी झाल्याने या शोची चर्चा रंगली आहे.