ड्रग्स तस्करीचा मुद्दा संसदेत पोहचला; रवी किशन म्हणाले फिल्म इंडस्ट्रीमध्येही ड्रग्सचे व्यसन

देशाची तरूण पिढी उध्वस्त करण्यासाठी शेजारील राष्ट्रांकडून षडयंत्र रचले जात असल्याचेही सांगितले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेला ड्रग्सचा मुद्दा सोमवारी संसदेत देखील समोर आला. भोजपुरी सुपरस्टार व भाजपाचे खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग तस्करीचा मुद्दा मांडला आणि केंद्र सरकारकडे मोठ्या पातळीवरील तपासाची मागणी केली.

रवी किशन म्हणाले की, ”ड्रग्स तस्करीची समस्या वाढत आहे. देशाच्या तरूण पिढीला ड्रग्सच्या माध्यमातून उध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. आपले शेजारील देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळ मार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे.”

”चित्रपट जगतात देखील ड्रग्सचे व्यसन जडत आहे. अनेकजणांना अटक करण्यात आलेली आहे, एनसीबी खरोखर चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, याप्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच, आपल्या शेजारील देशांचे कटकारस्थान संपुष्टात आणावे.” असे देखील त्यांनी लोकसभेत बोलून दाखवले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात ड्रग्सचा मुद्दा समोर आल्यानंतर, आता त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे. नारकोटिक्स ब्यूरोने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह जवळपास सहा ते सात जणांना अटक केलेली आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून अनेक ड्रग्स पेडलर्सला अटक देखील करण्यात आलेली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या रॅकेटचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, लोकसभेचं कामकाज मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजल्यापासून राज्यसभेचं कामकाज सुरु होईल. एएनआय ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं आश्वासन लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी दिलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drug addiction is in film industry too ravi kishan msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या