दारूच्या नशेत असलेल्या एका पतीने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करत चक्क ठार मारले. मात्र, आपण तिला ठार मारले आहे, हे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या लक्षात देखील आले नाही. एवढेच नाहीतर बायको झोपलेली आहे असं समजून तो शांतपणे कामावर देखील निघून गेला. अशी धक्कादायक घटना बंगळुरू येथे उघडकीस आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
शशीधर अलियास कुमार (२८) असे या व्यक्तीचे नाव असून तो बांधकाम कामगार आहे. तर, पुत्तमा (२८) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. दारूच्या नशेत असलेल्या कुमारने आदल्यादिवशी रात्री पुत्तमा हिला बेदम मारहाण केली होती. यावेळी त्याने पुत्तमाला लाकडी दांडक्याने देखील मारले, जे त्यावेळी तिला हे आपल्या जीवार बेतेल असं वाटल नाही म्हणून ती कोणतेही औषधउपचार न घेता झोपायला गेली.
यानंतर त्यांच्या ज्या नातेवाईकास पुत्तमा ही घरात मृत अवस्थेत असल्याचे आढळले, त्याने पोलिसांना माहिती दिली की, हे पती-पत्नी रोज भांडत होते. कुमारला माहिती देखील नव्हते की, त्याने त्याच्या पत्नीला ठार मारले आहे. पुत्तमाचा मृत्यू झाला आहे हे जेव्हा त्याला नातेवाईकाने फोन करून सांगितले, तेव्हा त्याने घराकडे धाव घेतली.
बायको अद्यापही झोपलेली आहे, असं समजून तो कामावर निघून गेला होता. त्याला हे देखील आठवत नव्हते की त्याने त्याच्या बायकोला दांडक्याने मारहाण केलेली आहे. आपल्याला किती मोठ्याप्रमाणत दुखापत झाली आहे, याची तिला जाणीव न होताच ती झोपी गेली होती आणि काहीतासानंतर अंतर्गत जखमांमुळे तिचा मृत्यू झाला. असं पोलिसांना सांगितलं आहे.
