बिहारमध्ये क्रूर अशी घटना समोर आली आहे. गया जिल्ह्यात एका पित्याने आपल्या ४ महिन्यांच्या जुळ्या मुलांचा निर्घृण खून केला आहे. यानंतर आरोपी पिता फरार झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती झाल्यानंतर पोलीस आरोपी पित्याचा शोध घेत आहेत.

थरकाप उडवणारी ही घटना गया जिल्ह्यातील मगध कॉलनी येथील आहे. मगध कॉलनीतील रोड क्रमांक ४ आणि ५ येथे देवेश शर्मा हा आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता. देवेश हा रिक्षा चालवत असे. बायको राणी शर्माने सांगितल्यानुसार, देवेश हा दारूच्या आहारी गेला होता. तसेच, अलीकडील काही दिवसांपासून तो दारू पिऊन घरी भांडण करायचा.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Thane Police, Arrest Parents, for Allegedly Murdering, One and a Half Year Old Daughter, Investigation Underway, crime in thane, crime in mumbra, parents allegedly murder daughter
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

हेही वाचा : लग्नानंतर वर्षभरात नवऱ्याने कधीच शारिरीक संबंध बनवले नाहीत, पत्नीची पोलिसात धाव; म्हणाली, “मी जवळ गेल्यावर तो…”

मुलांच्या खून केला त्यादिवशीही देवेश दारू पिऊन वाद घालत होता. राणी शर्माने म्हटलं की, भांडण सुरू असतानाच देवेशने मुलांना आपटलं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मुलांच्या खूनानंतर देवेश घरातून पळून गेला. घटनेनंतर राणी शर्माने पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोन्ही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नारायण मगध मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला.

हेही वाचा : रात्री नातवाला पडलं भयानक स्वप्न, सकाळी उठल्यावर केली आजी-आजोबांची हत्या, नेमकं प्रकरण काय?

याप्रकरणी मगध मेडिकलचे पोलीस अधिकारी शैलेस कुमार यांनी सांगितलं, “पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यातच देवेशने आपल्या जुळ्या मुलांचा खून केला आहे. देवेश अद्याप फरार असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल.” ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.