DSP Meets 14 Year Old Friend Video Viral: आपल्या अडचणीच्या काळात मदत करणाऱ्यांना कधीच विसरायचं नसतं असं नेहमी म्हटलं जातं. पण पुढे जात असताना अशी असंख्य माणसं मागेच सुटल्याची खंतही अनेकदा व्यक्त होत असते. पण मध्य प्रदेशातील भोपाळचे पोलीस उपअधीक्षक अर्थात डीएसपी संतोष पटेल यांनी मात्र त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणाऱ्या एका भाजीवाल्या मित्राची आठवण ठेवली. त्याला शोधून काढलं आणि त्याची गळाभेट घेतली. या भावनिक क्षणाचा व्हिडीओ त्यांनी ‘एक्स’वरील आपल्या हँडलवर शेअर केला आहे.

१४ वर्षांपासूनचा शोध संपला!

डीएसपी संतोष पटेल यांनी शेअर केलेल्या पोस्ट व व्हिडीओमध्ये या दोघांमधील अनोखी मैत्री दिसून येत आहे. १४ वर्षांनंतर त्यांनी सलमान खान या त्यांच्या भाजीवाल्या मित्राला शोधून काढल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. आपल्या भाजीच्या ठेल्यासमोर पोलीस अधिकाऱ्याची गाडी येऊन थांबल्याचं पाहून सलमान खान आधी थोडा घाबरला. पण नंतर गाडीत संतोष पटेल यांना पाहून त्याची ओळख पटली आणि १४ वर्षांनंतरच्या या भेटीमुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

“मला ओळखतोस का?” असा प्रश्न पटेल यांनी विचारताच “हो सर, तुम्ही भाजी घ्यायला यायचे”, असं म्हणत दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. या मैत्रीची सुरुवात जवळपास १४ वर्षांपूर्वी भोपाळमध्ये सलमान खानच्या याच भाजीच्या ठेल्यावर झाली होती. तेव्हा संतोष पटेल शिक्षण करत होते. त्यांची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे सलमान खान त्यांना मैत्रीखातर मोफत भाजी देत होता. सध्या ग्वाल्हेरमध्ये नियुक्तीवर असणाऱ्या संतोष पटेल यांनी आजही भोपाळमधील त्या सगळ्या घडामोडी आठवतात.

“मी पन्नामधील आमच्या १२० लोकांच्या कुटुंबातला पहिला पदवीधर. तसेच, मी आमच्या कुटुंबातला पहिला पोलीस अधिकारीही आहे. अनेक अडचणी असूनही तेव्हा मी भोपाळमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर मी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही सुरू केली. तेव्हा असेही अनेक दिवस असायचे, जेव्हा माझ्याकडे जेवणासाठी पैसे नसायचे. तेव्हा सलमान खान मला मित्रत्वाच्या नात्याने वांगे आणि टोमॅटो द्यायचा. तो मनाने खूप चांगला आहे”, असं संतोष पटेल सांगतात.

सलमान खानलाही १४ वर्षांपूर्वीचे त्यांच्या मैत्रीचे हे दिवस आठवतात. “जेव्हा पोलिसांची गाडी माझ्या ठेल्यासमोर येऊन उभी राहिली, तेव्हा मी घाबरलो हतो. पण जेव्हा मी पटेलला पाहिलं, तेव्हा मला एक जुना हरवलेला मित्र पुन्हा भेटला. मी हजारो लोकांना आजपर्यंत भाजी विकलेली आहे. पण कुणालाही माझा चेहरा लक्षात राहिला नाही. त्यांनी भाजी घेतली आणि ते निघून गेले. पण संतोष पटेल परत आले आणि मला भेटले. मी त्यांना सोशल मीडियावर फोलोही करतो. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. ते मला पुन्हा भेटतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांनी मला मिठाई आणि थोडे पैसेही दिले. त्यांना त्यांचे जुने दिवस विसरले नाहीत. ते मलाही विसरले नाहीत. माझ्यासाठी ही स्वप्नपूर्तीच आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया सलमान खाननं दिली आहे.

VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”

“ते माझ्यासारखेच होते…”

त्यांची स्थिती माझ्यासारखीच गरिबीची होती, असं सलमान खान सांगतो. “आमची परिस्थिती सारखीच होती. त्यामुळे आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. मी त्यांना कधीकधी भाज्या द्यायचो. ती काही फार मोठी गोष्ट नाही. एखाद्या गरीब मुलाला उपाशी ठेवून मी पैसे कशाला कमवू? तेव्हा असेच बरेच विद्यार्थी होते, ज्यांना मी फुकट भाजीपाला द्यायचो. तेव्हा संतोष पटेल मला माझ्या कामात मदतही करत होते”, अशी आठवण यावेळी सलमान खाननं सांगितली.

Story img Loader