Burj Khalifa building blast in Dubai latest news : इराणविरोधातील युद्धाचा आजचा १४ वा दिवस असून इराणने त्यांच्यावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, दुबईमध्ये मध्य भागात मोठ्या स्फोटांच्या आवाजाने इमारती हादरल्या असून धुराचे लोटही पसरले होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओंमध्ये दुबईतील आर्थिक केंद्रातील अनेक उंच इमारतींवर धुराचे लोट पसरलेले दिसत होते आणि स्फोटांच्या धक्क्याने इमारती हादरल्याचे वृत्त आहे. मध्य पूर्वेतील प्रमुख आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या दुबईच्या मध्यवर्ती भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. दरम्यान, या इमारती बुर्ज खलिफाजवळ आहेत.
दोन मोठ्या स्फोटांचा आवाज आला, परिणामी इमारती हादरल्या आणि मध्यवर्ती जिल्ह्यावर काळ्या धुराचे मोठे ढग पसरले. दुबई मीडिया ऑफिसने म्हटले आहे की मध्य दुबईतील एका इमारतीच्या बाहेरील भागात अडथळ्यांमुळे किरकोळ घटना घडली. दरम्यान, या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
X वरील एका पोस्टमध्ये, “मध्य दुबईतील इमारतीच्या दर्शनी भागावर एक किरकोळ घटना घडली. कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.” एएफपीच्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिराती शहराच्या मुख्य महामार्ग शेख झायेद रोडवरून सायरन ऐकू येत होते. वृत्तानुसार, या घटनेनंतर दुबई पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर (DIFC) येथे घडली. गुरुवारी, दुबईतील अधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यभागी स्फोटांचे आवाज ऐकल्यानंतर किरकोळ ड्रोन घटनेची तक्रार नोंदवली.
“अल बदा’आ परिसरात झालेल्या एका किरकोळ ड्रोन घटनेला दुबईचे अधिकारी चौकशी करत आहेत. या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही”, असे दुबई सरकारच्या मीडिया ऑफिसने X वरील पोस्टमध्ये म्हटले होते. २८ फेब्रुवारी रोजी मध्य पूर्व युद्ध सुरू झाल्यापासून इराणच्या हल्ल्यांचा सर्वाधिक फटका आखाताला बसला आहे, या प्रदेशात २४ लोक ठार झाले आहेत ज्यात सात अमेरिकन सैनिक आणि ११ नागरिकांचा समावेश आहे.
