श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना, बुधवारी अंत्यसंस्कार

कायदेशीर प्रक्रियेमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास उशीर

संग्रहित

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना झाले आहे. आज रात्री हे पार्थिव मुंबईत पोहचेल. तसेच उद्या म्हणजेच बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी श्रीदेवी यांच्या मुंबईतील निवासस्थानी हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुबई पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हे पार्थिव मुंबईत आणण्याचा मार्ग मोकळा झाला.  तसेच दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूची केसही बंद केली आहे. या संदर्भातली माहिती विपुल या दुबईतील भारतीय दुतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे. श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत. मागे अनंत आठवणी ठेवून श्रीदेवी नावाची चांदणी बॉलिवूडच्या चमचमत्या नगरीतून कायमची निखळली आहे.

शनिवारी एका लग्नसमारंभासाठी दुबईत गेल्या असताना श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाल्याची माहिती समोर आली. मात्र फॉरेन्सिक अहवालानंतर हा मृत्यू श्रीदेवी अपघाताने बाथटबमध्ये पडल्या आणि त्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यादरम्यान श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचीही चौकशी दुबई पोलिसांनी केली. त्याचमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्याच्या प्रक्रियेला उशीर लागला होता. आता मंगळवारी अखेर ही प्रक्रिया सुरु झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयीच्या या सर्व चर्चा पाहता आता सर्वांचेच लक्ष अंतिम अहवालाकडे लागून राहिले आहे. दरम्यान, एका प्रसिद्ध संकेतस्थळाने श्रीदेवींच्या डोक्यावर जखम आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे आता बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार असून निधनानंतरच्या कायदेशीर कारवाया पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कायदेशीर पद्धतींमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत होता. अखेर पुढील काही तासांत त्यांचे पार्थिव भारतात येणार असल्याचे समजते. श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर दुबई पोलिसांनी हे प्रकरण दुबई सार्वजनिक फिर्याद विभागाकडे सोपवले आहे. या विभागाचा अहवालही लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dubai police hands over letters for release of sridevis mortal remains to the indian consulate and her family members

ताज्या बातम्या