Odisha Trains Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये झालेल्या धडकेत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरून खाली घरसले आहेत. स्थानिक पथकं आणि एनडीआरफकडून बचावकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

ही घटना शुक्रवारी ( २ जून ) सायंकाळी घडली आहे. बहनागा स्टेशनजवळ बंगालमधील हावडा येथून चेन्नईकडे निघालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये ही धडक झाली आहे. पण, या घटनेबाबत ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी नवीन खुलासा केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

प्रदीप जेना यांनी सांगितलं की, “या घटनेत ३ रेल्वेंचा अपघात झाला आहे. पहिल्यांदा दुरंतो एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. त्यानंतर कोरोमंडल मागून येऊन धडकली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे ७ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.”

“५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बसेसच्या माध्यमातूनही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे,” अशी माहिती प्रदीप जेना यांनी दिला.

बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये १० जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर, अन्य जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसी येथे उपचारासाठी भरती केलं आहे. या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Story img Loader