दुबईत फिरायला जाऊन आलेल्या एका भारतीय महिलेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या भारतीय महिलेने म्हटलं आहे. सोशल मीडियावर या महिलेने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने म्हटलंय दुबई खूपच स्वच्छ आहे, तिथे प्रदूषण नाही, तसंच वाहतूक कोंडीची समस्याही नाही. यावर लोक व्यक्त झाले आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडीओत?
निकिता लखवानी या भारतीय महिलेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. निकिता म्हणतात, मी नुकतीच दुबईला जाऊन आले. तिथे प्रदूषण वगैरे काहीही नाही. एवढंच काय धूळही नाही आणि वाहतूक कोंडीची समस्या नाही. दुबईतल्या रस्त्यावरुन G Wagon एवढी छान चालते जशी काय ती i20 आहे. जर एखाद्या झेब्र कॉसिंगवरुन कुणी चालत असेल तर काही थांबतात, त्याचा आदर करतात, चालणाऱ्या माणसाला महत्त्व आहे हे पटवून देतात. ओसीडीवाल्यांसाठी दुबई डिस्ने वर्ल्ड आहे. तिथे गाडी जोरात चालवू शकता, कारण हळू गाडी चालवली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तिथे वाहतूक कोंडीचा काही प्रकार नाही. मी दुबईहून घरी आले आणि स्वच्छ रस्ते माझ्या डोक्यातून अजून जात नाहीत. एका माणसासाठी कार थांबतात. प्रदूषण आणि पोल्यूशन हे शब्द त्यांनी आपल्या आयुष्यात ऐकलेले नाहीत. मी भारतात परतले आहे पण मनाने वल हबीबी करत दुबईतच आहे, असं या महिलेने म्हटलं आहे.
होय मला अशा समस्या हव्या आहेत
या महिलेने असंही म्हटलं आहे की दुबईमध्ये धूळही नाही. निकिता यांनी असंही म्हटलं आहे की तिच्या मैत्रिणी दुबईत राहतात. त्यांची काळजी ही आहे की आमिराती कार्ड हरवू नये. मला अशा समस्या हव्या आहेत असंही निकिता यांनी म्हटलं आहे. तिथे गोष्टी हरवतही नाहीत असंही निकिता यांनी म्हटलं आहे. दुबई हे माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे, मला पुन्हा एकदा दुबईत जायला आवडेल असंही निकिता यांनी म्हटलंय. या व्हिडीओवर आता नेटकरी व्यक्त होत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नेटकरी नेमकं काय म्हणाले?
या व्हिडीओवर लोक व्यक्त होत आहेत. दुबई हे देखील आमचंही खास डेस्टिनेशन आहे. एका युजरने म्हटलं आहे की दुबई हे याचसाठी दुबई आहे. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की मी दुबईत आहे आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी खरोखरच डिस्नेलँडमध्ये आहे. तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की दुबई हा खरोखरच स्वर्ग आहे. जगातली सर्वात उत्तम जागा आहे असंही त्याने म्हटलं आहे.
