scorecardresearch

भारतात फिरण्यासाठी आलेल्या डच महिलेवर बलात्कार; आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने आरोपीचं कृत्य

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Rape sexual assault abuse
(प्रातिनिधिक छायाचित्र)

राजस्थानमधील जयपूर येथील सिंधी कॅम्पजवळील एका हॉटेलमध्ये आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने बलात्कार झाल्याचा आरोप एका ३१ वर्षीय डच महिलेने केला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. आरोपी बिजू मुरलीधरनला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मूळचा केरळचा रहिवासी असून तो शहरातील खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहत होता, असं पोलिसांनी सांगितलं. महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना बुधवारी घडली आहे.

तक्रारीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सिंधी कॅम्पजवळील हॉटेलमध्ये आयुर्वेदिक मसाज देताना  महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने गुरुवारी सायंकाळी सिंधी कॅम्प पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३७६ अन्वये तक्रार दाखल केली. आरोपी बिजू मुरलीधरन याला शुक्रवारी अटक करण्यात आली. मूळचा केरळचा रहिवासी असलेला मुरलीधरन येथील खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहतो. पीडिता ज्याठिकाणी तिच्या कुटुंबीयांसोबत थांबली होती, तिथे तिने आरोपीला आयुर्वेदिक मसाजसाठी बोलावले होते. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही ३१ वर्षीय महिला तिच्या कुटुंबातील काही सदस्यांसह १२ मार्च रोजी भारतात फिरण्यासाठी आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dutch woman alleges she was raped on pretext of ayurvedic body massage in jaipur hrc

ताज्या बातम्या