Crime Cases in India in 2022 Flashback :  चालू वर्ष आपल्या अंतिम टप्प्यात आहे. तसं पाहीलं तर हे वर्ष तसं सुखद होतं, कारण दोन वर्षांच्या करोना कालखंडानंतर यावर्षी निर्बंध शिथील झाल्याने लोकांना मोकळा श्वास घेता आला. मात्र या वर्षातच असे काही गुन्हे घडले ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. हे गुन्हे एवढे अमानुष होते की यामध्ये क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे दिसून आले. पाहूयात वर्षभरात घडलेले असे काही गंभीर गुन्हे कोणते आहेत.

वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात उघडकीस आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे अवघा देश हादरला. या गुन्ह्यातील आरोपी हा तिचा प्रियकर असूनही त्याने तिच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडे केले. याशिवाय अंकिता हत्याकांड, भागलपुरमध्ये भरदिवसा महिलेचे स्तन कापल्याची घटना आणि झारखंडमध्ये एकतर्फी प्रेमातून अंकिता सिंह हिला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना हे सर्वच गुन्हे देशभरातील नागरिकांसाठी संतापजनक आणि चर्चेचा विषय ठरले.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
It is mandatory to give the information to the police station about the citizens coming to live from abroad
परदेशातून राहायला येणाऱ्या नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक; पोलिसांचा मनाई आदेश लागू
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
firearms seized in thane marathi news, illegal firearms marathi news
निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ?

या हत्याकांडांमध्ये मारेकर्‍यांची क्रूरता, निर्दयीपणा, अमानुषता आणि त्यांचे विचार दिसून आले. भागलपूरमध्ये एका महिलेने एका विशिष्ट समुदायातील पुरुषाला तिच्या किराणा दुकानात बसण्यास नकार दिला. हा आपला अपमान समजून त्या व्यक्तीने भर रस्त्यात तिचे हात, कान आणि स्तन निर्दयीपणे कापले. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणही चर्चेत होते. भाजपाच्या एका प्रमुख नेत्याच्या मुलाशी संबंध असल्याने हे प्रकरणही राजकीय होते.

श्रद्धा वालकर हत्याकांड  –

दिल्लीमधील आफताब अमीन पूनावाला या २८ वर्षीय तरुणाने त्याची प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रेयसीची हत्या केल्यानंतर अत्यंत निर्दयीपणे आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवल्याची बाबही पोलीस तपासात उघडकीस आली आहे. आफताबने पोलिसांना कबुली जबाबात अनेक चित्रपट आणि वेबसिरीज पाहिल्यानंतर अशाप्रकारे हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचल्याचं सांगितलं आहे. यामध्ये आफताबने एका अमेरिकन क्राइम वेबसिरीजचंही नाव घेतलं आहे.

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१९पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. दक्षिण द्लिलीचे अतिरिक्त डीसीपी-वन अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर मुंबईत असताना झाली. दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. नोकरीनिमित्त ते दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने याच संतापातून तिची हत्या केली.”

अंकिता भंडारी हत्याकांड –

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारी या तरुणीच्या खुनानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांच्या मालकीच्या रिसॉर्टजवळील कालव्यात या तरुणीचा मृतदेह आढळून आला . मृत्यूच्या काही तासांपूर्वी अंकिताने तिच्या एका मित्राला फोन केल्याचे समोर आले होते. रिसॉर्टमधील अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुलकित आर्या आणि त्याचे साथीदार दबाव आणत असल्याचे अंकिताने तिच्या मित्राला सांगितले होते. “मी जरी गरीब असले, तरी स्वत:ला १० हजारांसाठी विकणार नाही” असे व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे अंकिताने तिच्या मित्राला म्हटल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणीच्या मृतदेहावर जखमा असल्याचेही समोर आले आहे. अंकिताच्या खून प्रकरणात पुलकित आर्या आणि त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

एकतर्फी प्रेमातून  अंकिता सिंह हिला जिवंत जाळले –

ऑगस्ट २०२२ मध्ये झारखंडमध्ये दुमका जिल्ह्यातील इयत्ता बारावीची विद्यार्थीनी अंकिता सिंह हिची हत्याही खळबळजनक होती. झोपलेल्या अंकिताला शाहरुख नावाच्या व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिले.यानंतर अंकिता रडत-ओरडत घराबाहेर पळाली होती. अनेक दिवस तिच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू होते, ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र २९ ऑगस्ट २०२२ रोजी तिचा मृत्यू झाला. तिला जेव्हा तिच्या वडिलांनी रुग्णालयात आणलं होतं, तेव्हा ती ९० टक्के भाजलेली होती.

या गुन्ह्यातील आरोपी शाहरुखला मात्र आपल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. कारण, जेव्हा त्याला पोलीस कोर्टात नेत होते तेव्हा तो हसत होता, ज्यामुळे नागरिक अधिकच संतापले होते. या घटनेवरून राजकारणही तापलं होतं. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी अनेक संघटनांनी आंदोलनही केली. या घटनेनंतर अंकिता  जिथे राहत होती त्या दुमका भागात प्रचंड तणाव होता. पोलिसांना कलम १४४  लागू करावे लागले होते. अंकिताच्या अंत्ययात्रेत मोठ्यासंख्येने जमाव आलो होता, त्यामुळे मोठा पोलीसफौजफाटाही तैनात होता.

भागलपुरमध्ये भररस्त्यात महिलेचे हात,कान आणि स्तन कापले –

कांडबिहारमधील भागलपुर जिल्ह्यातील घटना ही श्रद्धा हत्याकांडासारखीच अंगावर काटा आणणारी होती. या घटनेबाबत ज्याने कोणी ऐकलं त्याला कोणी इतकं निर्दयी कसं असू शकतं? असाच प्रश्न पडला. भागलपुरमधील पीरपैंती येथील राहणाऱ्या नीलम देवीची हत्या एका व्यक्ती आपल्या भावासोबत मिळून केली होती. या घटनेतील आरोपी शकीलने महिलेला धक्का देऊन रस्त्यात पाडले आणि त्यानंतर तिच्या शरीराचा एक एक भाग कापला. त्याने त्या महिलेचे स्तन कापले, दोन्ही हात कापले, कान कापले एवढच नाहीतर तो तिचे पायही कापणार होता. महिलेच्या पतीने सांगितल्यानुसार शकील त्या महिलेच्या दुकानावर येऊन तिला त्रास देत होता. हत्येच्या एक दिवस अगोदर महिलेने शकीलला तुझे चारित्र्य चांगले नाही, तू दुकानावर येऊ नको असे बजावले होते. या घटनेनंतर संतापलेल्या शकीलने महिलेची हत्या केली.