Earthquake In Delhi : राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यावर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घराच्या बाहेर पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तानमधील फैजाबाद आहे. तसेच, पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहौर आणि पेशावरमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केलची असल्याचं सांगितलं जात आहे.

पूर्ण उत्तर भारतातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्कानंतर भीतीने श्रीनगर आणि उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील नागरिक घरातून रोडवरती आले. भूकंपाने अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.

‘या’ शहरात जाणवले धक्के

उत्तराखंडच्या उत्तरकाशीत भूकंपाचे हलक्या स्वरूपाचे झटके जाणवले. त्यासह अलावा चमोली, उत्तराकाशीत गंगा घाटी, यमुनाघाटी, मसूरी, पंजाबात मोगा, बठिंडा, मानसा, पठानकोठ मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच, उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद, सहानरपुर, शामली आणि जयपूरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले आहेत.