Jammu Kashmir Earthquake today latest news updates and Delhi NCR tremors : जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात तसेच दिल्ली-एनसीआरमध्ये देखील शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री ९:४५ च्या सुमारास काही सेकंद हे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरल्याचे पाहायला मिळाले आणि नागरिक आपल्या घरातून बाहेर पळाले. दरम्यान हे हादरे बसल्यानंतर यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जिवीतहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
जम्मू-काश्मीरमधील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली की, या भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदु हा अफगाणिस्तानमध्ये होता. दरम्यान उत्तर भारतातील नोएडा, चंदिगढ, पंजाबमधील लुधियाना तसेच जम्मू-काश्मीरमधील पूंछ, श्रीनगर, उधमपूर आणि देहरादूनसह इतर अनेक शहरांमध्ये हे हादरे नोंदवले गेले.
