राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप | earthquake in delhi ncr with magnitude of 2 point 5 rmm 97 | Loksatta

X

राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के बसले आहेत.

राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
सांकेतिक फोटो

काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे दिल्लीसह आसपासचा प्रदेश हादरला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा दिल्लीत भूंकपाचे हादरले जाणवले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दिल्लीत २.५ रेश्टर स्केलचा भूंकप झाला आहे. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने अनेकांना याबाबत जाणवलं नाही.

पण अवघ्या दोन आठवड्यांच्या आत दिल्ली परिसरात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची किंवा पडझड झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही.

हेही वाचा- मोठी बातमी: राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के, ५.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) रात्री साडेनऊच्या सुमारास नवी दिल्लीच्या पश्चिम भागातत भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप २.५ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ५ किलोमीटर आतमध्ये होता. एकाच महिन्यात दोनवेळा भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 23:31 IST
Next Story
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”