मेक्सिकोत ७.४ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा

नुकसानीची कोणतीही प्राथमिक माहिती अद्याप उपलब्ध नाही

मंगळवारी रात्री दक्षिण मेक्सिकोमध्ये अॅकापुल्कोच्या रिसॉर्टजवळ भूकंपाचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे मेक्सिको शहरातल्या २०० मैलांवरच्या इमारतीही हादरल्या आहेत. भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. शहरात भूकंपाचे धक्के बसले तेव्हा लोकांनी हादरलेल्या इमारतींचे फुटेज शेअर केले.

अमेरिकेच्या भूकंपशास्त्र विभागाने सांगितले की, भूकंपाची प्राथमिक तीव्रता ७ ते ७.४ इतकी होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू रिसॉर्ट शहरापासून ४८ किलोमीटर (३० मैल) अंतरावर असलेल्या गुएरेरो राज्यातील पुएब्लो मॅडेरोच्या ८ किलोमीटर (सुमारे 5 मैल) पूर्व-केंद्रस्थानी होती. भूकंप क्षेत्राकडून तात्काळ कोणतेही अहवाल आले नाहीत.

मेक्सिको शहरात, राजधानीच्या काही भागात जवळपास एक मिनिट हादरे बसत होते. नुकसानीची कोणतीही प्राथमिक माहिती नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Earthquake jolts mexico buildings shake no primary damage noted vsk