एपी, दुबई : इराणमध्ये देशव्यापी निदर्शने सुरू असतानाच बुधवारी नागरिकांना अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्ट फोनवर भूकंपाची सूचना देणारे खोटे संदेश पाठविण्यात आले. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांनी परस्परविसंगत दावे केले आहेत. इराणच्या सायबर पोलीस विभागाचे उपप्रमुख कर्नल रामिन पाशाई यांनी इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले की, केवळ अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्ट फोनवरच हे चुकीचे संदेश प्राप्त झाले. इराणच्या सरकारी सेवापुरवठादार इराण मोबाइल कम्युनिकेशन कंपनीकडून चाचणीदरम्यान चुकून हे संदेश लोकांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, इराणच्या इर्ना या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, हा हॅकिंगचा प्रकार होता. हे संदेश खोटे असून त्याला नागरिकांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये, घराबाहेर पडू नये. त्यामुळे हा प्रकार नक्की कशामुळे घडला, हे अद्याप तरी ठामपणे सांगता येत नाही. अ‍ॅन्ड्रॉईड सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या गुगलकडे याबाबत विचारणा केल्यानंतरही त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली नाही.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

इराणच्या नैतिकता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा त्यानंतर मृत्यू झाला होता. १६ सप्टेंबरच्या या घटनेनंतर देशात अनेकदा हॅकिंगचे प्रकार झाले आहेत. या तरुणीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांना आता तेथील धर्मवादी सरकार उलथवून टाकण्यासाठीच्या आंदोलनाचे स्वरूप आले आहे. १९७९ च्या इस्लामी क्रांतिनंतरच्या काळातील हे एक मोठे आव्हान सरकारपुढे आहे.