चीन, जपानमध्ये भूकंपात सहाजण मृत्युमुखी

चीन व जपानला भूकंपाचे जबरदस्त धक्के बसले असून चीनमध्ये एकूण सहा ठार, तर ७९०००जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

चीन व जपानला भूकंपाचे जबरदस्त धक्के बसले असून चीनमध्ये एकूण सहा ठार, तर ७९०००जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. तेथे भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर होती. सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जपानमध्येही काल ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून मध्य जपानमधील नागानो शहरात अनेक घरे कोसळली, तर तीस जण जखमी झाले आहेत. टाँगगाँग येथे  चेंगराचेंगरीत ४२ मुले जखमी झाली आहेत.
चीनमधील भूकंपानंतर मदतकार्य सुरू झाले असून तेथे एकूण ५४ जण जखमी झाले आहेत. चीनच्या नेत्यांनी शिचुआन प्रांतात काल भूकंप होताच मदतकार्याचे आदेश दिले आहेत. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी  सांगितले की, प्रादेशिक व नागरी अधिकाऱ्यांनी वेगाने मदतकार्य करून हानी टाळावी. दोन तास चाललेल्या भूकंपाचे केंद्र असलेल्या टॉंगगाँग येथे ३५ सदस्यांचे पथक पाठवण्यात आले असून सहा लष्करी विमाने , ६० वैद्यकीय कर्मचारी व  १००० सैनिक पाठवण्यात आले आहेत. पंतप्रधान ली केकियांग यांनी हानीची ताबडतोब खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रेड २ भूकंपाचा प्रतिसाद यावेळी भूकंप प्रशासन देत आहे. तंबू, विजेचे साहित्य तेथे पाठवण्यात आले आहे. १२ मे २००८ मध्ये चीनच्या वेनचुआन प्रांतात ८ रिश्टरचा भूकंप होऊन ८०००० लोक मरण पावले होते, तर गेल्यावर्षी लुशान येथे गेल्या वर्षी ७ रिश्टरच्या भूकंपात १९६ लोक मरण पावले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Earthquakes strike china and japan

ताज्या बातम्या