कर विवरण भरणे झाले अधिक सुलभ

काही संकेतस्थळ कर भरणा करण्यासह गुंतवणुकीच्या अनेक संधींचीही माहिती पुरविणार आहेत.

अनेक पोर्टल्सच्या माध्यमातून कर परतावा भरण्याची सोय, वेळेत बचत

वार्षिक कर विवरण भरण्याची ३१ जुलै ही अंतिम तारीख जवळ येत असतानाच विविध पोर्टल्सच्या माध्यमातून फक्त एका क्लिकच्या साहाय्याने कर विवरण भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना वेळेत कर विवरण भरण्याची सोय उपलब्ध झाली असून तिचा फायदा लाखो करदात्यांना होणार आहे.

केंद्र सरकारकडून कर विवरण प्रक्रिया सुलभ करण्याबाबत तसेच करदात्यांना कर भरताना होणारा मन:स्ताप कमी करण्याच्या सूचना प्राप्तीकर विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने अनेक पोर्टल्सच्या माध्यमातून सेवा देण्यासह संकेतस्थळ अधिक जलद आणि तंत्रज्ञानाने परीपूर्ण केल्याने करदात्यांच्या वेळेत बचत होणार आहे.

काही संकेतस्थळ कर भरणा करण्यासह गुंतवणुकीच्या अनेक संधींचीही माहिती पुरविणार आहेत. तर काही पोर्टल्स व्हिडीओ, ब्लॉग्स यांच्या माध्यमातून करदात्यांना आवश्यक असणारी माहिती देणार आहेत. २०१४-१५ या आर्थिक वर्षांदरम्यान दहा लाखाहून अधिक करदात्यांनी संकेतस्थळाचा वापर केला आहे.

विनाअडथळा ई-विवरण करण्याची सुविधा

‘क्यूयूआयसीकेओ डॉट कॉम’ या संकेतस्थळाने प्रत्येक करदात्याला विनाअडथळा ई-विवरण करण्याची सुविधा दिली आहे. करदाते फॉर्म-१६ कोणत्याही वेळी सादर करू शकतात, असे या संकेतस्थळाचे संस्थापक विष्टद्धr(२२४)वजित सोनागरा यांनी म्हटले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Easy method in annual tax statement

ताज्या बातम्या