ec letter to political parties to know financial planning to fulfill election manifesto zws 70 | Loksatta

फुकटेगिरीवर आयोगाचा अंकुश? ; आचारसंहितेत सुधारणांचा प्रस्ताव

‘‘निवडणूक आश्वासनांबाबत अपुरी माहिती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

फुकटेगिरीवर आयोगाचा अंकुश? ; आचारसंहितेत सुधारणांचा प्रस्ताव

नवी दिल्ली : निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत भेट, योजनांची आश्वासने, घोषणांबाबत निवडणूक आयोगाने आचारसंहितेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव राजकीय पक्षांसमोर ठेवला आहे. निवडणूक आश्वासनांतील आर्थिक व्यवहार्यता आणि तथ्यांबाबत मतदारांना संपूर्ण माहिती देण्याबाबत आयोगाने पक्षांचे मत मागवले आहे.

‘‘निवडणूक आश्वासनांबाबत अपुरी माहिती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या पोकळ निवडणूक आश्वासनांचे दूरगामी परिणाम होतात. निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांमागील औचित्य दिसले पाहिजे. आश्वासनांत पारदर्शकता, विश्वासार्हता हवी. ती पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद कशी आणि कोणत्या माध्यमातून केली जाईल, हे मतदारांना सांगितले पाहिजे. त्यामुळे आश्वासनांची पूर्तता करताना होणाऱ्या आर्थिक परिणामाची माहिती मिळाल्यानंतर मतदार योग्य निर्णय घेऊ शकतील’’, असे आयोगाने राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना १९ ऑक्टोबपर्यंत आपली मते मांडण्यास सांगितले आहे. आयोगाने दिलेल्या मुदतीत राजकीय पक्षांचा प्रतिसाद न मिळाल्यास या विषयावर त्यांना विशेष काही बोलायचे नाही, असे गृहीत धरले जाईल, असेही आयोगाने नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘रेवडी संस्कृती’चा उल्लेख करत मोफत योजनांच्या आश्वासनांवरून विरोधकांना लक्ष्य केले होते. त्यास विरोधकांनीही प्रत्युत्तर दिले होते.

विरोधकांची टीका

वीज, पाणी, शाळा आणि अन्य सुविधा पुरविणे ही कोणत्याही सरकारची जबाबदारी असते. सरकारने करदात्यांचा पैसा हा नेते, त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी नव्हे, तर सामान्य नागरिकांना या सुविधा पुरविण्यासाठी वापरायला हवा, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने व्यक्त केली. राजकीय पक्षांच्या आश्वासनांबाबत निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करू नये, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पंतप्रधान मोदी यांचा झेलेन्सी यांच्याशी दूरध्वनी संवाद ; युक्रेनमधील अणुप्रकल्पांबाबत चिंता 

संबंधित बातम्या

विश्लेषण : चीनमध्ये जनक्षोभ, करोना, टाळेबंदीविरोधात नागरिक रस्त्यावर; नेमकं कारण काय?
ट्रॅकवर मुलं बोरं खात बसलेली असतानाच समोरुन ट्रेन आली अन्….; पंजाबमधील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना
‘कॉलेजियम’वरून केंद्र सरकार व न्यायव्यवस्था आमने-सामने, किरण रिजिजूंच्या टीकेवर न्यायमूर्तींनी व्यक्त केली नाराजी
मुंबईत ‘जिगोलो’चे काम देण्याचे आमिष, टोळीकडून ३५० पुरुषांची फसवणूक; दोघांना बेड्या
धक्कादायक! घशात चॉकलेट अडकल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न
विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटल्याचा VIDEO व्हायरल; प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई
‘फुलाला…’ मालिकेचा सुगंध सदैव दरवळत राहणार; लोकाग्रहास्तव वाहिनीचा मोठा निर्णय
जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा…