अर्थव्यवस्था रुळावरुन घसरलीय, मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येतेय – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी एक न्यूज रिपोर्ट टि्वट करुन भारतीय अर्थव्यवस्था रुळावरुन घसरल्याचा आरोप केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची जी स्थिती आहे त्यामध्ये मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येत आहे असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर राहुल यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावरही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. मिस्टर पीएम, अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली असून बोगद्याच्या शेवटी कुठलाही प्रकाश दिसत नाहीय. तुमच्या अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश आहे असे सांगत असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा मंदीची ट्रेन पूर्ण वेगात येत आहे असे राहुल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ यंदाच्या जूनमध्ये शून्यावर स्थिरावली आहे. तेल तसेच सिमेंट उत्पादन रोडावल्याने जून २०१९ मध्ये एकूण पायाभूत क्षेत्र ०.२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल यांनी हे टि्वट करुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Economy derailed train of recession coming full throttle rahul gandhi dmp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या