पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर देशात राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मनिपूरमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणुक सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अधिकारी व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी आठ जानेवारी रोजी व्हीआरएस अर्ज आणि भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत वक्तव्य केले आहे. तर आता अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहसंचालक राजेश्वर सिंग यांचा व्हीआरएस स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लखनऊमध्ये कार्यरत असलेल्या राजेश्वर सिंह यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा अर्ज केला होता. राजेश्वर सिंह आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र, या संदर्भात राजेश्वर सिंह यांच्याकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. असीम अरुण यांच्याप्रमाणेच राजेश्वर सिंग हेही अतिशय उच्चपदस्थ अधिकारी राहिले आहेत. असीम अरुण हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेमध्ये तैनात होते आणि आयएसआयएस दहशतवादी सैफुल्लाच्या चकमकीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. तर राजेश्वर सिंह यांनी सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत राहिले आहेत. राजेश्वर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचे आरोप होते. या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली. कॉमनवेल्थ गेम्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा यांसारख्या प्रकरणांच्या तपासातही राजेश्वर सिंह यांचा सहभाग आहे.

narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
arjun modhvadiya
गुजरातमध्ये विक्रमी मताधिक्याचा भाजपचा प्रयत्न
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Cancellation of by-elections in Akola West Assembly Constituency is likely to affect the Lok Sabha
अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द झाल्याचा निर्णय कुणाच्या पथ्यावर?

लोकसत्ता विश्लेषण : उत्तर प्रदेशची निवडणूक देणार देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे; मतदार कोणाला देणार कौल?

राजेश्वर सिंह हे मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पाखरौली येथील आहे. त्यांनी बी.टेक.ची पदवी घेतली आहे. यासोबतच राजेश्वर सिंह यांनी पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयात पीएचडी केली आहे. १९९६च्या बॅचचे (तात्पुरती पोलीस सेवा) पीपीएस अधिकारी असण्यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशात पोलीस अधिकारी म्हणूनही काम केले आहे. २००९ मध्ये ते अंमलबजावणी संचालनालयात रुजू झाले. सहा वर्षांनंतर म्हणजेच २०१५ मध्ये त्यांचा कायमस्वरूपी ईडीच्या कॅडरमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांना ईडी लखनऊ झोनचे सहसंचालकही करण्यात आले. ईडीमध्ये रुजू झाल्यानंतरच त्यांचे नाव हायप्रोफाईल प्रकरणांशी जोडले जात होते.

त्यानंतर ईडीचे सहसंचालक असणाऱ्या राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतल्याचेही वृत्त आहे. ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. भाजपात जाण्यासंदर्भातील मुद्यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या व्हीआरएसबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सिंह हे गाझियाबादच्या साहिबाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

“डिजिटल प्रचारात भाजपाशी स्पर्धा करू शकत नाही, निवडणूक आयोगाने मदत करावी”; अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुका जाहीर होताच कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी व्हीआरएस साठी अर्ज केला. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली आहे असे म्हटले. फेसबुकवर पोस्ट शेअर करताना त्यांनी, आता मला नव्या पद्धतीने देश आणि समाजाची सेवा करायची आहे. योगी आदित्यनाथ यांनी मला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वासाठी योग्य मानले आहे,” असे म्हटले आहे. तेव्हापासून अरुण विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु आहे.