ईडीने शुक्रवारी (७ ऑक्टोबर) दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि हैदराबादमध्ये जवळपास ३५ ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घाणेरड्या राजकारणासाठी अनेक अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवला जात असल्याची प्रतिक्रिया दिली.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “मागील तीन महिन्यात ५०० छापे टाकण्यात आले. यासाठी ३०० हून अधिक सीबीआय आणि ईडीचे अधिकारी २४ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधात पुरावा शोधत आहेत. मात्र, त्यांना काहीही पुरावा मिळाला नाही. अनेक अधिकाऱ्यांचा वेळ यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी वापरला जात आहे.”

ईडीने या प्रकरणात एकूण १०३ छापे टाकल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय इंडोस्पिरिट या दारू निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय समीर महंद्रू यांनाही अटक केली आहे.