“नरेंद्र मोदींना घाबरत नाही, त्यांनी हवं ते करावं मी माझं काम करत राहणार,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘हेराल्ड हाऊस’संदर्भातील कारवाईबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिली आहे. काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’च्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘हेराल्ड हाऊस’मधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल यांनी हा सारा प्रकार म्हणजे दबाव टाकण्यासाठी केलेली कारवाई असल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण: २००० कोटींची संपत्ती ५० लाखांमध्ये… ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? सोनिया गांधी, राहुल गांधींशी संबंध कसा?

‘ईडी’ने मंगळवारी ‘हेराल्ड हाऊस’वर छापे टाकले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंग इंडियाचे कार्यालय पूर्वपरवानगीशिवाय न उघडण्याचा आदेशही काढला. ‘हेराल्ड हाऊस’वर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘हेराल्ड हाऊस’सह अकबर रोडवरील काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ‘दहा जनपथ’ निवासस्थान तसेच, शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली. अकबर रोडच्या लगत असलेल्या सर्व रस्त्यांचीही नाकाबंदी करण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख व खासदार जयराम रमेश यांनी, काँग्रेस मुख्यालयाला गराडा घातला असून छावणीचे स्वरूप आल्याची टीका केली व पोलिसांच्या नाकाबंदीची चित्रफीतही समाजमाध्यमांतून प्रसारित केली होती. या प्रकरणातील चक्रे वेगाने फिरू लागल्याचे स्पष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> “तुमच्या धमक्यांना भीक घालणारी…”; नड्डांच्या ‘फक्त भाजपा टिकेल’वरुन शिवसेनेचा हल्लाबोल, गुजरात दंगल अन् मोदींचाही केला उल्लेख

“हा सगळा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडा दबाव टाकून हे गप्प बसतील. पण आम्ही गप्प बसणार नाही,” असं राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तसेच, “या देशात लोकशाहीविरोधात नरेंद्र मोदी, अमित शाह जे करत आहेत त्याविरोधात आम्ही उभे राहणार. त्यांनी काहीही केलं तरी आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काही फरक पडत नाही,” असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “तीन कोटी रोख देऊन संजय राऊत यांनी अलिबागमध्ये…”; ईडीचा मोठा खुलासा; छापेमारीत हाती लागली महत्त्वाची कागदपत्रं

“आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही. समजलं का? काही फरक पडणार नाही. देशाचं संरक्षण करणं, येथील लोकशाहीचं संरक्षण करणं देशातील ऐक्य जपणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहणार,” अस म्हणत राहुल यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या घरात साडेअकरा लाख तर अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी; कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम आणि सोनं ठेवता येतं?

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: ‘न्यायालयाने ढवळाढवळ करु नये’ या युक्तीवादावरुन सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, “तुम्ही न्यायालयात…”

‘ईडी’च्या कारवाईमुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला. सोनिया गांधींच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा फौजफाटा दिसू लागताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले. त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शीद आदी नेत्यांनी बैठक घेऊन केंद्र सरकार व भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी सकाळच्या सत्रात लोकसभेत थेट अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या हौदात येऊन केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत होत्या. काँग्रेस सातत्याने विरोधी नेत्यांच्या ‘ईडी’ चौकशीविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर गेले होते, रात्री उशिरा ते दिल्लीत परत आले.