Chinese Controlled Loan Apps : अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) शुक्रवारी (१६ सप्टेंबर) चिनी लोन अ‍ॅप्सवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने सांगितले की, या आठवड्यात छापेमारीनंतर ईझबझ, ‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ आणि ‘कॅशफ्री’च्या आभासी(वर्चुअल) खात्यांद्वारे जमा केलेले ४६.६७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

ईडीने माहिती दिली की, ईझबझ प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडील एकूण ३३.३६ कोटी, कॅशफ्री पेमेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू – १.२८ कोटी, रॅझॉरपे सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू – ८.२१ कोटी आणि पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड नवी दिल्ली – १.११ कोटी. ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. १४ सप्टेंबर रोजी दिल्ली, मुंबई, गाझियाबाद, लखनऊ आणि गया येथे या प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.

mugdha vaishampayan cook special food on the occasion on ram navami
वरणभात, आमरस अन्…; मुग्धा वैशंपायनने रामनवमीनिमित्त केला महानैवेद्य, प्रथमेश फोटो शेअर करत म्हणाला…
marathi serial Pinkicha Vijay Aso completed 700 episodes
Video: ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेने ७०० भागांचा टप्पा केला पूर्ण, महेश कोठारेंसह कलाकारांनी केलं ‘असं’ सेलिब्रेशन
jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule shares engagement photos
‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभने गुपचूप उरकलेला साखरपुडा, पहिल्यांदाच शेअर केले फोटो अन् सांगितली तारीख
amruta khanvilkar shares special birthday wish post for husband
Video : रोमँटिक डेट, गेटवे ऑफ इंडियाला सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरची पती हिमांशूसाठी खास पोस्ट

तपासासंदर्भात दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बेंगळुरू येथील बँका आणि पेमेंट गेटवेच्या १६ ठिकाणांचाही यात समावेश आहे. नागालँडमधील कोहिमा पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने ऑक्टोबर २०२१ मध्ये मनी लाँडरिंगचा हा खटला नोंदवला होता.

काय आहे प्रकरण :

HPZ टोकन ही अ‍ॅप  आधारित कंपनी आहे. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांनी वापरकर्त्यांना अधिक नफा कमावण्याचे आमिष दाखवले. यामध्ये यूपीआय आणि इतर पेमेंट गेटवेद्वारे वापरकर्त्यांकडून गुंतवणुकीचे पैसे घेतले गेले. सुरुवातीला काही अंशी रक्कमही गुंतवणूकदारांना देण्यात आली. मात्र, नंतर फसवणूक करणाऱ्यांनी पैसे देणे बंद केले आणि त्यांची वेबसाइटनेही काम करणे बंद केले.

विश्लेषण: कर्जविषयक चिनी अ‍ॅप्सची चौकशी का करण्यात येत आहे? ‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ ईडीच्या निशाण्यावर का आहेत?

आरोपानुसार, शिल्लक रक्कम विविध पेमेंट गेटवे आणि बँकांद्वारे वेगवेगळ्या व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. छाप्यादरम्यान, ईडीला कळाले की, ते बनावट पत्त्यावर काम करत होते. HPZ टोकन लिलियन टेक्नोकॅब प्रायव्हेट लिमिटेड आणि शिगु टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या फसवणुकीत गुंतलेल्या विविध कंपन्यांमागे गुरुग्राममधील जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.