विमान अपहरणाचा दहशतवादाशी संबंध नाही; सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांची माहिती

हे विमान सायप्रस येथील एका विमानतळावर उतरवण्यात आल्याचे वृत्त आहे.

Egyptair aircraft hijacked , Cyprus , terroirst hijack plane, Loksatta, loksatta news, Marathi, maathi news
Egyptair aircraft hijacked lands in Cyprus : सायप्रसच्या प्रसारण संस्थेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या विमानात सात क्रू मेंबर्ससह ६० प्रवाशी आहेत.

अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणाऱ्या इजिप्तमधील प्रवासी विमानाचे मंगळवारी सकाळी अपहरण झाले. मात्र, या अपहरणानंतर काही नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. सध्या विमानातील चार कर्मचारी आणि तीन प्रवाशी अपहरणकर्त्याच्या ताब्यात आहेत. कमरेवर स्फोटके बांधलेल्या एका प्रवाशाने स्फोट घडविण्याची धमकी देत या विमानाचे अपहरण केले. अपहरण झाले त्यावेळी विमानात एकूण ५५ प्रवासी आणि ७ कर्माचाऱ्यांसह ६२ जण होते. अपहरण झाल्यानंतर हे विमान सायप्रसमधील लानार्का विमानतळावर उतरविण्यात आले.

दरम्यान, या अपहरणकर्त्याची ओळख पटवण्यात यश मिळाले असून त्याचे नाव इब्राहिम समाहा असे आहे. समाहा हा अलेक्झांड्रिया विद्यापीठात पशुवैद्यकीय औषध विभागाचा प्रमुख असल्याची माहितीही समोर आली आहे. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस अॅनास्टान्सिएडेस यांनी काहीवेळापूर्वीच विमानाच्या अपहरणाचा दहशतवादाशी संबंध नसल्याचे जाहीर केले. सायप्रसमध्ये विमान उतरवल्यानंतर इब्राहिम समाहाने सुरूवातीला विमानातील महिला व लहान मुलांना बाहेर सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार विमानातील कर्मचारी आणि चार परदेशी नागरिक वगळता इतर सर्व प्रवाशांना अपहरणकर्त्याने सोडले होते.
प्रत्यक्षदर्शांच्या माहितीनुसार इब्राहिम समाहाने विमानातून एक पत्र खाली टाकले होते. हे पत्र लार्नाका येथे राहत असलेल्या त्याच्या पूर्व पत्नीस त्याने लिहिलेले एक पत्र दिले जावे, अशी मागणी केली होती. याशिवाय, आपल्याला सायप्रसमध्ये राजकीय आश्रय मिळावा, अशी मागणीही केली होती. त्यामुळे या अपहरणामागे वेगळे कारण असावे, असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Egyptair aircraft hijacked lands in cyprus reports