धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत केंद्र सरकारकडून आठ युट्यूब चॅनल बॅन

बॅन केलेल्या खात्यांमध्ये सात भारतीय तर एका पाकिस्तानी युट्यूब चॅनलचा समावेश आहे.

धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत केंद्र सरकारकडून आठ युट्यूब चॅनल बॅन
जाहिराती शिवाय युट्यूब व्हिडिओ पाहा. (फोटो : File Photo)

भारतविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत केंद्र सरकारने आज आठ युट्यूब चॅनेल बंद केले आहे. यामध्ये सात भारतीय तर एका पाकिस्तानी युट्यूब चॅनलचा समावेश आहे. तसेच एक फेसबुक खाते आणि दोन फेसबुक पोस्टही केंद्र सरकारकडून बंद करण्यात आले आहे. बंद केलेल्या खात्यांना एकूण ११४ कोटी व्हूज असून त्यांचे ८५ लाख सबस्क्रायबर्स आहेत.

हेही वाचा – अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाबाबत अजित पवारांना आश्चर्य; म्हणाले, “तुमच्याकडे कृषीमंत्रीपद आल्यामुळे मी…”!

ब्लॉक केलेल्या युट्यूब चॅनेलमध्ये लोकतंत्र टीव्ही, U&V टीव्ही, एएम रझवी, गौरवशाली पवन मिथिलांचल, सरकारी अपडेट आणि सबकुछ आणि देखो, यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानचे न्यूज की दुनिया हे चॅनलही बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Comedian Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन डेड झाल्याची भीती, सुनिल पालची माहिती

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व युट्यूब चॅनल भारतात धार्मिक द्वेष परवण्याचे काम करत होते. तसेच खोटी आणि भारतविरोधी माहितीही या चॅनलद्वारे पसरवल्या जात होती. यामुळे देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता होती, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ पासून सरकारने आतापर्यंत १०२ युट्यूब चॅनेल आणि इतर अनेक सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eight youtube chanel ban by indian government for spreading religious hatred spb

Next Story
सौदी अरेबियातील महिलेला ट्वीटर वापरणे पडले महागात; ३४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी