पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने जाहीर सभेत बिहारविरोधी वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार मनोरंजन ब्यापारी यांनी बिहारच्या जनतेला ‘एक बिहारी सौ बिमारी’ असे म्हटले आहे. बंगाल ‘रोगमुक्त’ झाला पाहिजे, असेही सांगितले. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मनोरंजन ब्यापारी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, टीएमसी आमदार म्हणाले की, जर बंगाली रक्त तुमच्या रक्तवाहिनीत धावत असेल तर… खुदीराम आणि नेताजी यांचे रक्त तुमच्या नसांमध्ये वाहत असेल आणि जर तुम्हाला तुमच्या मातृभाषेवर आणि मातृभूमीवर प्रेम असेल तर तुम्हाला मोठ्याने ओरडावे लागेल. ‘एक बिहारी, सौ बिमारी’ (बिहारचा एक माणूस १०० रोगांच्या बरोबरीचा असतो) असा जयघोष करावा लागतो. आम्हाला आजार नको आहेत. बंगाल रोगमुक्त करा. जय बांगला, जय दीदी ममता बॅनर्जी.”

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग

नुकतेच कोलकाता पुस्तक मेळ्यात मनोरंजन ब्यापारी यांनी हे वक्तव्य केले. बिहारमध्ये सर्व काही आहे, तर बिहारला परत जा, असेही म्हणाले. सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, “यापूर्वी त्यांच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बिहारी आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना ‘बोहिरागोटो’ (बाहेरचे) आणि आता बंगालला बिहारींपासून मुक्त करा.”

सुवेंदू अधिकारी यांनी पुढे म्हटले की ममतांना बिहारमधील अभिनेता-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांचीही गरज होती, ज्यांना अलीकडेच बंगालमधील पोटनिवडणुकीसाठी तृणमूलचे उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आले आहे. “बिहारी बाबू श्री शत्रुघ्न सिन्हा यांना माझा नम्र प्रश्न. सर, टीएमसी आमदार मनोरंजन ब्यापारी यांच्या या लाजिरवाण्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या पक्षातील तुमच्या नवीन सहयोगी बिहारींबद्दलच्या भावनांबाबत अतिशय पारदर्शक आहेत,” असेही अधिकारी यांनी म्हटले.

ब्यापारी हे गेल्या वर्षीच्या बंगाल निवडणुकीत हुगळीमधून विजयी झालेले आमदार आहेत. अहवालानुसार, ते वयाच्या २४ व्या वर्षी तुरुंगात वाचायला शिकले आणि अनेक पुस्तके लिहिली.