मुख्य माहिती आयुक्तांची (सीआयसी) निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय निवड समितीमध्ये लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असून त्यांनी अरुण जेटली आणि मल्लिकार्जुन खरगे यांची या समितीवर नियुक्ती केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्यापही सुस्पष्टता नसल्याने विधि मंत्रालयाच्या सल्ल्यावरून  खरगे  यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.