गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व बंडखोर शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात आमदारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोर गटामागे कुणाची शक्ती आहे याबाबत कुणाचंही नाव न घेता सूचक वक्तव्य केलं आहे. “तो एक राष्ट्रीय पक्ष आहे, ते महाशक्ती आहेत,” असं सांगत त्यांनी जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा ते मदत करणार असल्याची माहिती दिली.

शिवसेना नेते व राज्याचे जलसंवर्धन मंत्री तानाजी सावंत ‘जो निर्णय घ्यायचा त्याचे आमचे सर्व अधिकार एकमताने आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देत आहोत’, असं म्हणताना व्हिडीओत दिसत आहे. तुम्ही आमचं नेतृत्व स्विकारा असंही समोर बसलेल्या आमदारांपैकी काही जण बोलत आहेत.

Narayan Rane Uddhav Thackeray
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो”
Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Sanjay Raut, Raju Shetty
…तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे या व्हिडीओत म्हणत आहेत, “आता आपलं जे काही सुख दुःख आहे ते एकच आहे. काहीही असेल तर आपण एकजुटीने सामना करू. विजय आपलाच आहे. तुम्ही म्हणालात की तो राष्ट्रीय पक्ष आहे, ते महाशक्ती आहेत. त्यांनी पाकिस्तानला हादरवलं.”

“जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा सर्वांना प्रचिती येईल”

“त्याच पक्षाने मला सांगितलं आहे की तुम्ही घेतलेला निर्णय देशातील ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काहीही लागलं तर कधीही कमी पडणार नाही. याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा सर्वांना येईल,” असंही एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सांगत आहेत.