मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्री शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस दिल्लीमध्ये असतील. शिंदे गटाला किती मंत्रीपदे आणि कोणती खाती द्यायची, याबाबत शाह आणि नड्डांबरोबर बैठकीत निर्णय होईल. शिंदे यांना गटनेतेपदी कायम ठेवणे आणि भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती या बाबींना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्याचा आव्हान देणारी शिवसेनेची याचिका आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या नोटिसा यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै सुनावणी होणार आहे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

मुख्यमंत्री शिंदे आषाढी एकादशीला शनिवारी रात्री पंढरपूरला शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात अपेक्षित असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी नमूद केले. राज्यामध्ये सत्तावाटप नेमकं कसं होणार यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात असतानाच दिल्लीच्या या दौऱ्यानंतर सत्तावाटपासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होईल असं सांगितलं जातंय.

नक्की वाचा >> ठाण्यातील सेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत; विरोधात आहे एकमेव महिला नगरसेवक कारण…

अनेकांना मंत्रीपदाचे वेध
 शिवसेनेच्या विरोधातील बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बहुसंख्य आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रीपदाच्या आशेनेच काही आमदारांनी शिंदे गटात उडी घेतली होती. शिंदे यांना साथ देणाऱ्या अपक्षांच्या अपेक्षांचे ओझेही त्यांच्यावर आहे.

शिंदे गटातील माजी मंत्री कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यात शिवसेनेच्या सात मंत्र्यांचा समावेश होता. शिंदे गटात प्रवेश करताना या मंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली होती व त्यानुसार शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्यासह संदीपान भुमरे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई या सात माजी मंत्र्यांनी शिंदे यांना साथ दिली होती.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे असल्याने…
भाजपाबरोबर युतीत शिंदे गटाला किती मंत्रिपदे येतात हे अद्याप तरी जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली असावी. कदाचित शिंदे व फडणवीस यांच्या नवी दिल्ली भेटीनंतर मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले जाईल. शिंदे गटातील बहुतांशी आमदारांना आपण मंत्री व्हावे असे वाटत असल्याने युतीत जास्तीत जास्त मंत्रिपदे मिळावीत, असा शिंदे यांचा प्रयत्न असेल. पण मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने जास्तीत जास्त मंत्रिपदे घेण्यावर भाजपाचा भर असेल.