Bhagalpur Danapur intercity train Video : भागलपूर-दानापूर इंटरसिटी ट्रेनमध्ये पोलीस निरीक्षकासा काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिकीटाच्या कारणावरून एका वृद्ध टीसीला मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांना तिकीट मागितले म्हणून त्यांनी लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप टीसीने केला आहे.
हेही वाचा – ”मँजिस्ट्रेट्सनी डोकं वापरावं, प्रत्येक प्रकरण पुढे ढकलायला ते पोस्ट ऑफिस नाहीत”; केरळ हायकोर्टाचे खडे बोल
भागलपूर-दानापूर इंटरसिटी ट्रेनमध्ये बख्तियारपूर येथे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वृद्ध टीसीला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होते आहे. या व्हिडीओत टीसीने पोलीस कर्चचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे.
” मी तिकीट तपास असताना काही पोलीस कर्मचारी बोगीत बसले होते. त्यांच्याकडे तिकीट नव्हेत. मी त्यांना सांगितले की थोड्या वेळाने प्रवाशी आल्यानंतर तुम्हाला उठावे लागेल. त्यावरून त्यांनी मला अश्लील भाषेत बोलणे सुरू केले. तसेच लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली”, असा गंभीर आरोप वृद्ध टीसीने केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ” हे पोलीस कर्मचारी मला मारत होते. मात्र, कोणीही वाचवायला आले नाही. अखेर काही महिलांनी मला मदत केली. मी रडत होते. मात्र, त्यांनी मला मारणे थांबवले नाही”
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी बिहार पोलिसांवर टीकेची झोड उडवली आहे.
हेही वाचा – महुआ मोईत्रांच्या वक्तव्यावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘धर्माचं आचरण करणं….’