scorecardresearch

रणधुमाळी : निवडणूक सभाबंदीस पुन्हा मुदतवाढ; आता ३१ जानेवारीपर्यंत मनाई

देशभरात करोना रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्यक्ष प्रचारसभा, रोडशो यांना आधी १५ जानेवारीपर्यंत आणि नंतर २२ जानेवारीपर्यंत मनाई करण्याचा निर्णय आयागाने यापूर्वी घेतला होता.

उत्तर प्रदेशातील कैराना येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.

आता ३१ जानेवारीपर्यंत मनाई

उत्तर प्रदेश , पंजाब , गोवा, उत्तराखंड ,मणिपूर

निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष सभा, मेळावे आणि रोडशो काढण्यावरील बंदीची मुदत येत्या ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला.

देशभरात करोना रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्यक्ष प्रचारसभा, रोडशो यांना आधी १५ जानेवारीपर्यंत आणि नंतर २२ जानेवारीपर्यंत मनाई करण्याचा निर्णय आयागाने यापूर्वी घेतला होता. प्रत्यक्ष प्रचाराऐवजी राजकीय पक्षांनी आभासी सभा, डिजिटल माध्यम आणि समाजमाध्यमांद्वारे प्रचार करावा, असे आयोगाने सूचविले होते. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ५८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास  शुक्रवारपासून सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याबाबत आयोगाने अधिसूचना जारी केली आहे.  

काँग्रेस उमेदवार सपमध्ये

काँग्रेसच्या पहिल्या उमेदवारी यादीत समावेश असलेल्या बरेलीच्या महापौर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सुप्रिया अरुण यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी अखिलेश यादव उपस्थित होते. ते बरेली कान्टमधून समाजवादी पक्षाच्या उमेदवार असतील, असे यादव यांनी जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शामली, मीरत आणि कैराना येथे घरोघरी  मतदारांशी संवाद साधला.

अखिलेश यादव करहालमधून मैदानात

दरम्यान, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख अखिलेश यादव हे आपली विधानसभेची पहिली निवडणूक मौनपुरी जिल्ह्यातील करहाल मतदारसंघातून लढणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election ban extended again election campaign central election commission by political parties akp

ताज्या बातम्या