आता ३१ जानेवारीपर्यंत मनाई

उत्तर प्रदेश , पंजाब , गोवा, उत्तराखंड ,मणिपूर

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
4 lakhs tanker rounds in pune within in a year
पुण्यात वर्षभरात टँकरच्या ४ लाख फेऱ्या
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर

निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष सभा, मेळावे आणि रोडशो काढण्यावरील बंदीची मुदत येत्या ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला.

देशभरात करोना रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्यक्ष प्रचारसभा, रोडशो यांना आधी १५ जानेवारीपर्यंत आणि नंतर २२ जानेवारीपर्यंत मनाई करण्याचा निर्णय आयागाने यापूर्वी घेतला होता. प्रत्यक्ष प्रचाराऐवजी राजकीय पक्षांनी आभासी सभा, डिजिटल माध्यम आणि समाजमाध्यमांद्वारे प्रचार करावा, असे आयोगाने सूचविले होते. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ५८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास  शुक्रवारपासून सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याबाबत आयोगाने अधिसूचना जारी केली आहे.  

काँग्रेस उमेदवार सपमध्ये

काँग्रेसच्या पहिल्या उमेदवारी यादीत समावेश असलेल्या बरेलीच्या महापौर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सुप्रिया अरुण यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी अखिलेश यादव उपस्थित होते. ते बरेली कान्टमधून समाजवादी पक्षाच्या उमेदवार असतील, असे यादव यांनी जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शामली, मीरत आणि कैराना येथे घरोघरी  मतदारांशी संवाद साधला.

अखिलेश यादव करहालमधून मैदानात

दरम्यान, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख अखिलेश यादव हे आपली विधानसभेची पहिली निवडणूक मौनपुरी जिल्ह्यातील करहाल मतदारसंघातून लढणार आहेत.